भाईंदर: शहरातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले असून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता अधिक तीव्र झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोपांची देवाणघेवाण सुरू असून, या वादाने खालची पातळी गाठल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणुकीनंतर काहीसा शांत झालेला राजकीय संघर्ष पुन्हा पेटला असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. मंत्री प्रताप सरनाईक हे वारंवार ठाण्यावरून येऊन माझ्यावर आरोप करतात, असा पलटवार माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केला.