राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; उकाड्यातून दिल्लीकरांना दिलासा... (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमधील हवामान अधिकच बिघडत चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन होते. मात्र, पण शुक्रवारी त्यात बदल होऊन पाऊस झाला. दुपारपर्यंत सूर्यप्रकाश चांगलाच होता, पण तीनच्या सुमारास हवामान अचानक बदलले. जोरदार वारे वाहू लागले आणि अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला, ज्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र, या वादळामुळे लोकांना गैरसोयीचाही सामना करावा लागला.
दिल्लीत अचानक आलेल्या या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. रात्रभरात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आणि मोठी वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे लोकांना मोठी गैरसोय झाली. हवामान विभागाने शुक्रवारसाठी हवामानात बदल होण्याचा अंदाज आधीच वर्तवला होता आणि दिल्लीसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.
दरम्यान, या काळात, कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कमाल आर्द्रता ७२ टक्के आणि किमान २४ टक्के होती. मेघगर्जनेमुळे तापमानातही ६ ते ८ अंश सेल्सिअसची घट झाली.
पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार
१८ आणि १९ एप्रिल रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर २० ते २२ एप्रिलपर्यंत हवामान निरभ्र राहील. या कालावधीत कमाल तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने असा इशाराही दिला आहे की, तापमान वाढल्याने काही भागांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते.
दिल्लीसह आसपासच्या परिसरात गारवा
सध्याचा हवामानातील बदल हा मध्य आणि वरच्या सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे आहे. खालच्या स्तरावर दक्षिण पंजाबपासून नैऋत्य मध्य प्रदेशपर्यंत पसरलेला एक द्रोणी (ट्रफ) देखील तयार झाला आहे. यामुळे, दिल्लीच्या काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत ३-५ मिमी पावसाची नोंद झाली. पालम परिसरात सोसाट्याचा वाराही वाहिला, ज्यामुळे हवामानावर आणखी परिणाम झाला.
Weather Update : शेतकऱ्यांची चिंता आता वाढणार; हवामान विभागाकडून महत्त्वपूर्ण अंदाज जारी






