काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकमेकांविरोधात मैदानात; लोकसभेतही सपा देणार काँग्रेसला शह

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Madhya Pradesh Assembly Election) 'इंडिया' (INDIA) आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकमेकांविरोधात मैदानात होते. काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उमेदवार जाहीर केले होते.

    भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Madhya Pradesh Assembly Election) ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकमेकांविरोधात मैदानात होते. काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उमेदवार जाहीर केले होते. आता समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

    काँग्रेसला मध्य प्रदेशात शह देण्याच्या उद्देशाने पक्ष कार्यालय बांधण्यासाठी खजुराहो येथे दोन भूखंड खरेदी केले आहेत. भूखंड खरेदी करण्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. खजुराहोमधून समाजवादी पक्ष मध्य प्रदेशच्या राजकारणात आपले अस्तित्व दाखवेल. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सपाने बराच विचार करून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

    सपाचे मध्य प्रदेशातील आघाडीसमोर आव्हान

    बुंदेलखंड ते मध्य प्रदेशपर्यंत कार्यालये उघडून समाजवादी पक्ष आपला पक्ष बळकट करण्याच्या रणनितीवर काम करत आहे. अखिलेश यादव यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीपूर्वी बुंदेलखंडमध्ये कार्यालय उघडून काँग्रेसवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे.