फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मानुसार प्रदोष व्रत अत्यंत शुभ आणि प्रभावी मानले जाते. हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित असून, भक्त मोठ्या भक्तीभावाने त्यांची पूजा करतात. असे मानले जाते की, या दिवशी केलेल्या प्रामाणिक पूजेमुळे भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. हा उपवास महिन्यातून दोनदा तेराव्या दिवशी पाळला जातो. भक्त दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारित करण्यासाठी विधी करतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी वैशाख महिन्याचा पहिला प्रदोष एका अत्यंत शुभ योगात येत आहे, ज्यामुळे तो अधिकच विशेष ठरत आहे. या दिवशी शिवलिंगाला काही विशेष वस्तूंचा अभिषेक केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात. एप्रिल महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे आणि शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात ते जाणून घेऊया
पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात 15 एप्रिल रोजी मध्यरात्री १२:१२ वाजता होणार आहे. ही तिथी १५ एप्रिल रोजी रात्री १०:३१ वाजता संपेल. त्यामुळे, १५ एप्रिल रोजी प्रदोष व्रत पाळले जाणार आहे.
वैशाख महिन्याच्या पहिल्या प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा करणे महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी तीळ अर्पण करणे किंवा तीळ मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे जीवनातील पापे कमी होतात आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्याने विशेष फळ मिळते. या दिवशी गहू आणि धोत्रा
अर्पण करणे शुभ मानले जाते. पूजा करताना, सुख, शांती आणि संततीसाठी भगवान शिवाकडे प्रार्थना करा. श्रद्धा आणि भक्तीने केलेला हा विधी सकारात्मक परिणाम देतो आणि महादेवाचा आशीर्वाद टिकवून ठेवतो.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल, तर वैशाख प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला तांदूळ अर्पण करणे फायदेशीर मानले जाते. भक्तीभावाने केलेला हा विधी धनप्राप्तीचा मार्ग मोकळा करतो. असे मानले जाते की, यामुळे घरात समृद्धी वाढते आणि हळूहळू आर्थिक अडचणी दूर होतात.
प्रदोष व्रत हे भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा एक अत्यंत शुभ मार्ग मानला जातो. ज्यावेळी हे व्रत बुधवारी येते, तेव्हा त्याचे महत्त्व अधिकच वाढते. भक्तीभावाने आणि खऱ्या मनाने पूजा केल्यास भगवान शिव आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. हे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख, अडथळे आणि नकारात्मकता दूर होते. तसेच, तो सुख, शांती आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: प्रदोष व्रत हे भगवान भगवान शिव यांना समर्पित व्रत आहे, जे त्रयोदशी तिथीला पाळले जाते.
Ans: पाणी आणि दूध, बिल्वपत्र, धतूरा आणि बेलफत्र, फुले आणि अक्षत
Ans: “ॐ नमः शिवाय” हा मंत्र जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते.






