Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : राहुल गांधी महाकुंभमेळ्याला जाणार का? काय म्हणाले एकदा ऐकाच…

प्रयागराजमध्ये गेल्या महिन्यापासून महाकुंभमेळा सुरू आहे. या महाकुंभमेळ्याला देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 20, 2025 | 10:45 PM
राहुल गांधी महाकुंभमेळ्याला जाणार का? काय म्हणाले एकदा ऐकाच...

राहुल गांधी महाकुंभमेळ्याला जाणार का? काय म्हणाले एकदा ऐकाच...

Follow Us
Follow Us:

प्रयागराजमध्ये गेल्या महिन्यापासून महाकुंभमेळा सुरू आहे. या महाकुंभमेळ्याला देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाकुंभमेळ्याला जाणार की नाही याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. अशात दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांना, ते महाकुभमेळ्याला जाणार आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

रायबरेलीच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. या संवादादरम्यान ते म्हणाले, “भाजप-आरएसएसचे लोक म्हणतात की इंग्रजी भाषा शिकू नये. मोहन भागवत म्हणतात की आपण इंग्रजीत बोलू नये. पण इंग्रजी भाषा हे एक शस्त्र आहे, जर तुम्ही ही भाषा शिकली तर तुम्ही कुठेही जाऊ शकता, मग ते तामिळनाडू, जपान असो, मुंबई असो किंवा कोणत्याही कंपनीतील नोकरी असो. त्यांना वाटते की तुम्ही इंग्रजी शिकू नये कारण जिथे ही भाषा वापरली जाते तिथे दलित, आदिवासी आणि गरीबांनी येऊ नये असे त्यांना वाटते. पण इंग्रजी हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. हिंदी देखील महत्त्वाची आहे, तुमची मुळे तोडणे योग्य नाही. पण इंग्रजी देखील खूप महत्त्वाची आहे.”

या रायबरेली दौऱ्यादरम्यान ते एका कार्यक्रस्थळी कारमधून उतरले तेव्हा, काही पत्रकारांना त्यांना ते महाकुंभमेळ्याला जाणार का? असे विचारण्यात आले. तेव्हा ते पत्रकारांना नमस्कार असे म्हणाले आणि पुढे निघून गेले.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी सर्वप्रथम, बछराव येथील कामगारांच्या एका कार्यक्रमात भाषण. येथे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “भाजपाने जीएसटी आणि नोटाबंदी लागू केली. यामुळे लहान व्यावसायिक उद्ध्वस्त झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने प्रामाणिकपणे काम केले तर देशातील कोट्यवधी तरुणांना रोजगार मिळू शकेल.”

Web Title: Congress leader rahul gandhi reaction on asking hi will go to mahakumbh 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • Kumbh Mela
  • Mahakumbh 2025
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

राहुल गांधींची साडेतीन तासांनंतर सुटका; प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, राजधानीतील वातावरण तापले…
1

राहुल गांधींची साडेतीन तासांनंतर सुटका; प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, राजधानीतील वातावरण तापले…

राहुल गांधी ताब्यात; सोनिया गांधी पोलीस ठाण्यात दाखल, काँग्रेसचे आंदोलन अधिक तीव्र
2

राहुल गांधी ताब्यात; सोनिया गांधी पोलीस ठाण्यात दाखल, काँग्रेसचे आंदोलन अधिक तीव्र

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!
3

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात
4

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.