Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: दिल्ली न्यायालयातून CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट करत केंद्र सरकारला धारेवर धरले.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 14, 2026 | 04:04 PM
Rahul Gandhi, Congress, CJP, Jantar Mantar, Narendra Modi,

Rahul Gandhi, Congress, CJP, Jantar Mantar, Narendra Modi,

Follow Us
Follow Us:
  • CJP नेत्यांच्या ५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर राहुल गांधींचा मोदी सरकारवर कडक प्रहार.
  • जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे गुन्हा नाही, तरुणांना तुरुंगात डांबणे भ्याडपणा” — राहुल गांधी.
  • विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि ‘इंडिया’ आघाडीच्या आंदोलनांचे उद्दिष्ट एकच असल्याचे प्रतिपादन.
Rahul Gandhi on CJP leaders Arrest:  जंतर मंतरवर तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही. यासाठी तरुणांना तुरुंगात टाकणे हा भ्याडपणा आहे.” अशी टिका करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल  गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.  जंतरमंतर मैदानात तिरंगा फडकावून घोषणाबाजी केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना बुधवारी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावरून राहुल  गांधी यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र डागले आहे.
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत काँग्रेस खासदार म्हणाले, ” जंतर-मंतरवर शांततापूर्ण आंदोलनादरम्यान तिरंगा फडकवणे हा काही गुन्हा नाही. त्यासाठी तरुणांना तुरुंगात डांबणे हा भ्याडपणा आहे. विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि ‘इंडिया’ (INDIA) आघाडी… संघटना वेगळ्या असल्या, तरी उद्दिष्ट एकच आहे. सर्व आंदोलनांचा सूर एकच आहे: देशवासी आपल्या घटनात्मक हक्कांची मागणी करत आहेत. जंतर-मंतर भारताच्या जनतेचे आहे आणि आपण ते पुन्हा मिळवूनच राहू!” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?
राहुल म्हणाले की, विविध नागरी समाज गट, विद्यार्थी आणि इंडिया ब्लॉक यांची आंदोलने ही वास्तविक पाहता एकाच चळवळीचा भाग आहेत, जरी त्यांचे झेंडे वेगवेगळे असले तरी. विद्यार्थी, तरुण, पत्रकार, इंडिया ब्लॉक… झेंडे वेगवेगळे आहेत, पण उद्देश एकच आहे. सर्व आंदोलने एकच आहेत.  नागरिक आपल्या घटनात्मक हक्कांची मागणी करत आहेत.

सौरव आणि आशुतोष रांका यांना तिहार तुरुंगात पाठवले

गेल्या १०-१२ दिवसांत देशातील विरोधी इंडिया आघाडी आणि  कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने केली.या निदर्शनांमुळे केंद्र सरकारचा ताणही चांगलाच वाढला आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जंतरमंतर मैदान आंदोलन स्थळ म्हणून रद्द करत असल्याची घोषणा केली. यानंतरही सीजेपीच्या नेत्यांनी आपण जंतरमंतरवरच आंदोन करणार असल्याचा पवित्रा घेतला आणि काल दुपारी गनिमी काव्याने जंतरमंतरवर प्रवेश करत तिरंगा फडकावला आण घोषणाबाजीही केली.
परवानगीशिवाय जंतर मंतर परिसरात प्रवेश केल्याबद्दल आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना मंगळवारी प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले. त्यांना बुधवारी सकाळी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी (एसईएम) यांच्यासमोर हजर करण्यात आले.
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 18 हजारांचा पगार थेट 69 हजारांवर जाणार? कसं
सुनावणीदरम्यान, दंडाधिकाऱ्यांनी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना शांतता कराराचे उल्लंघन करून जंतर मंतरमध्ये प्रवेश केल्याबद्दल दोषी ठरवत त्यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. तर, अजिंक्य शिंदे यांची ५,००० रुपयांच्या जामीनावर सुटका करण्यात आली. जंतर मंतर आता आंदोलनाचे ठिकाण म्हणून ओळखले जात नाही.

 देशात अनधिकृत आणीबाणी लागू

अभिजीत दिपके म्हणाले की, मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की तुम्हाला देशात आणीबाणी लावायचीच असेल तर ती अधिकृतपणे जाहीर करा.  सीजेपीच्या नेत्यांना फक्त  जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्यामुळे तुम्ही भित्र्याप्रमाणे तुम्ही पाच दिवस तुरूंगात टाकत आहात. असं तर आणीबाणीच्या काळातही झाले नव्हते, तिरंगा फडकावणे हे कधीपासून पाप मानले जात आहे. असे भित्र्यासारखे वागू नका. तुमच्यात दम असेल तर आणीबाणीची अधिकृत घोषणा करा.  असे आव्हानही अभिजीत दिपकेंनी दिले आहे.
दरम्यान,  ताब्यात असलेल्या सीजेपीच्या नेत्यांना राहुल गांधी यांनी उघडपणे पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या भूमिकेत बदल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आंदोलन सुरू असताना सीजेपीपासून अंतर ठेवल्याबद्दल काँग्रेसवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे.

जंतर मंतरवर आंदोलन; १४ जणांना अटक

मंगळवारी सकाळी सीजेपीच्या नेत्यांसह १४ जणांनी गेट आणि बॅरिकेड्स ओलांडून जंतर मंतर परिसरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तिरंगा फडकावत घोषणाबाजी केली. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली.
परवानगीशिवाय जंतर मंतर परिसरात प्रवेश करणे आणि जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी हे नेते दिल्लीत दाखल झाले होते. त्यावेळी विमानातूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. याच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांनी जामिनाच्या अटी मान्य केल्या होत्या.
Waving the Tricolour at Jantar Mantar in a peaceful protest is not a crime. Jailing youth for it is an act of cowardice.Students. Youth. Journalists. The INDIA bloc. Different banners, one cause. All protests are one: citizens demanding their constitutional rights. Jantar Mantar belongs to the people of India. We will reclaim it. — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 14, 2026

Web Title: Rahul gandhi slams pm modi over cjp leaders arrest at jantar mantar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • CJP
  • Congress
  • INDIA Alliance
  • Jantar Mantar
  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान
1

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान

Delhi Police arrrest CJP Leaders: दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक
2

Delhi Police arrrest CJP Leaders: दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल
3

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी
4

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.