नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. दिल्लीतील 70 जागांवर 1.5 कोटीहून अधिक मतदार त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून मतदान करणार आहेत. दरम्यान 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. कॉँग्रेस-आप आणि भाजपमध्ये मुख्य लढत होणार आहे. कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. नवी दिल्लीमधून प्रवेश वर्मा, संदीप दीक्षित आणि अरविंद केजरीवाल अशी लढत होत आहे.
राहुल गांधी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी दिल्लीवासीयांना आवाहन केले आहे. त्यात राहुल गांधी म्हणाले, “माझ्या दिल्लीच्या लाडक्या बहिणी आणि भावांनो. आज सर्वांनी मतदान करावे असे मी आवाहन करतो. कॉँग्रेसला दिलेले एक-एक मत तुमच्या अधिकारांचे संरक्षण करेल. संविधान मजबूत करणारे ठरेल. तसेच दिल्लील पुन्हा प्रगतीच्या मार्गवार नेईल.”
दिल्ली के मेरे प्यारे भाइयों-बहनों।
मैं आप सभी से अपील करता हूं कि आज वोट देने अवश्य जाएं।
कांग्रेस को दिया आपका एक-एक वोट आपके अधिकारों की रक्षा करेगा, संविधान को मजबूत करेगा और दिल्ली को प्रगति के पथ पर फिर से मोड़ेगा।
वोट देते समय याद रखें कि प्रदूषित हवा, गंदा पानी, टूटी…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 5, 2025
मतदान करताना, प्रदूषित हवा, खराब पाणी, खराब रस्ते याला कोण जबाबदार आहे लक्षात ठेवा. स्वच्छ राजकारण करणार असे म्हणून दिल्लीत सर्वात मोठा घोटाळा कोणी केला हे लक्षात ठेवा. दरम्यान अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी तसेच अन्य वरिष्ठ नेत्यांनी आपापला मतदानाचा अधिकार बजावला आहे.
‘आप’-भाजपमध्ये ‘कांटे की टक्कर’
मतदानाची टक्केवारी
दिल्लीत 2015 मध्ये 67.13 टक्के तर 2020 मध्ये 62. 59 टक्के मतदान झाले हते. दोन्ही वेळेस मतदान हे शनिवारी झाले होते. काही प्रमाणात मतदान कमी झाले असल्याची चर्चा होती. यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मतदानांची टक्केवारी वाढल्यास कोणाला फायदा होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
विभाजित मतदान पद्धत
2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मतांचे विभाजन पद्धती पहायला मिळाली. म्हणजेच मतदारांनी लोकसभेत एका पक्षाला तर विधानसभेत दुसऱ्या पक्षाला मतदान केले होते. कोणती निवडणूक आहे त्यावरून मतदान करतात असे दिसून आले आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेले मतदार देखील असतात. दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या बाजूने मतदान करणारे मतदार आहेत.
चेहरा
प्रत्येक निवडणुकीत त्या-त्या पक्षाचा चेहरा कोण असणार यावर देखील निवडणुकीचा निकाल अपेक्षित असतो. आम आदमी पक्षाकडे अरविंद केजरीवाल तर भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक दोघांसाठी महत्वाची समजली जात आहे.
काय आहे दिल्लीच्या जनतेचा मूड?
सी-वोटरने दिल्लीच्या जनतेला सरकार बदलायचे आहे का? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. 1 फेब्रुवारीपर्यंत घेतलेल्या अंदाजानुसार 43.9 टक्के जनता ही सध्याच्या सरकारच्या कामावर नाराज आहे. तसेच त्यांना यावलेस सत्ता बदल हवा आहे, असे जनतेचे मत दिसून आले. 10 ते 11 टक्के जनता नाराज आहे पण त्यांना सरकार बदलण्यात रस दिसून येत नाहीये. तसेच 38.3 टक्के नाराज नसून, त्यांना सरकार बदलायचे नाही असे त्यांचा मूड आहे. सरकार बदलायचे आहे बदलायचे नाही यामध्ये समान टक्केवारी पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीची जनता नक्की कोणाला साथ देणार हे 8 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.