Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone Arnab : ‘अर्नब’ चक्रीवादळाचा हाहाकार; नद्या-नाले तुडूंब, अनेक गावांचा संपर्क तुटला

Cyclone Arnab : छत्तीसगडमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्नब वादळामुळे मागील तीन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. यामुळे येथील अनेक जिल्ह्यांमधील नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून किनाऱ्यालगतच्या गावांमधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 26, 2026 | 09:12 PM
Cyclone Arnab : 'अर्नब' चक्रीवादळाचा हाहाकार; नद्या-नाले तुडूंब, अनेक गावांचा संपर्क तुटला

Cyclone Arnab : 'अर्नब' चक्रीवादळाचा हाहाकार; नद्या-नाले तुडूंब, अनेक गावांचा संपर्क तुटला

Follow Us
Follow Us:
  • छत्तीसगडमधील अनेक गावांचा संपर्क तुटला
  • धरणांमधील हजारो लीटर पाणी नद्यांमध्ये सोडले
  • मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
 

बंगालच्या खाडी (Bangal creck) त निर्माण झालेला ‘अर्नब’ (Cyclone Arnab ) चक्रीवादळामुळे छत्तीसगड (Chattisgad) मध्ये मागील तीन दिवसांपासून तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळे रायपुर, बिलासपुर, बस्तर, दुर्ग आणि सरगुजामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले तुडूंब भरले असून गावागावांचा संपर्क तुटला आहे.

येथील अधिकाऱ्यांनी अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला असून संकटकाळी आपत्तीव्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री विष्णुदेव साय (Vishnudev say) यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिलेत.

अनेकांची घरे पाण्याखाली

महासमुंद जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच सततच्या पावसामुळे येथील नद्यांनी रुद्ररुप धारण केले आहे. तसेच गंगरेल धरणातील पाणी या नद्यात सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला असून अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत.

बम्हानी गावातील एका दारुचे दुकान पाण्यात बुडाल्यामुळे तेथे दोन कामगार फसले होते. त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच बचाव पथकाने त्यांना सुरक्षित तेथून बाहेर आणले.

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

किनाऱ्यावरील 18 गावांना अलर्ट जारी

स्थानिक प्रशासनाने नदी किनाऱ्यावरील 18 गावांसाठी अलर्ट जारी केला आहे. अर्नब चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका बस्तर, मंडल व जवळपासच्या जिल्ह्यांना पडला. नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला त्याचा मोठा फटका बसला आहे.

धमतारी स्थित गंगरेल धरण 98 टक्के भरल्यामुळे त्याचे 14 दरवाजे उघडण्यात आले. धरणातील 50 हजार क्युसेक पाणी हे महानदीत सोडण्यात आले. दुसरीकडे, मुरुमसिल्ली बांध पूर्णक्षमतेने (100 टक्के) भरला आहे, तर बलोद येथील दुधवा आणि सोंधुर धरणाची पातळी 90 टक्क्यांच्या वर गेली आहे.

सर्वसामान्यांना दिलासा ! ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल होणार स्वस्त; आयातशुल्क कपातीच्या निर्णयाचा परिणाम

Web Title: Cyclone arnab wreaks havoc in chhattisgarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • Chattisgarh
  • Cyclone
  • High Alert

संबंधित बातम्या

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा
1

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा

‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका? ‘या’ दोन राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 75 किमीपर्यंत वाऱ्यांची शक्यता; शाळांना सुट्टी
2

‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका? ‘या’ दोन राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 75 किमीपर्यंत वाऱ्यांची शक्यता; शाळांना सुट्टी

भलं मोठं संकट! Asian Games ला ‘या’ चक्रीवादळाचा रेड अलर्ट; ‘इतक्या’ वेगाने जपानवर धडकणार
3

भलं मोठं संकट! Asian Games ला ‘या’ चक्रीवादळाचा रेड अलर्ट; ‘इतक्या’ वेगाने जपानवर धडकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.