Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisha Bhanjanagar Landslide : घराएवढे मोठे दगड, चिखलाचा खच; ओडिशातील भूस्खलनात बेपत्ता नागरिकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

Odisha Bhanjanagar Landslide : ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील भंजनगर परिसरात भूस्खलनानंतर बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी 250 बचाव कर्मचारी आणि 100 मजूर तैनात आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 03, 2026 | 07:53 PM
Odisha Bhanjanagar Landslide : घराएवढे मोठे दगड, चिखलाचा खच; ओडिशातील भूस्खलनात बेपत्ता नागरिकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

Odisha Bhanjanagar Landslide : घराएवढे मोठे दगड, चिखलाचा खच; ओडिशातील भूस्खलनात बेपत्ता नागरिकांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न

Follow Us
Follow Us:
  • 250 बचाव कर्मचारी आणि 100 मजूर तैनात
  • ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू
  • घराएवढे मोठे दगड हटविण्याचे आव्हान
 

ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील भंजनगर परिसरात भूस्खलनामुळे (Odisha Bhanjanagar Landslide) ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली काही जण जिवंत असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जात आहे. खराब हवामान असूनही बचाव पथकांनी सोमवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरू ठेवली. मंगळवारी सकाळी पुन्हा बचावकार्याला सुरुवात करण्यात आली.

ओडिशाचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री सुरेश पुजारी यांनी बचावकार्याबाबत माहिती देताना, बेपत्ता व्यक्ती सुखरूप असतील, अशी आशा व्यक्त केली. ढिगाऱ्याखाली जीवित असल्याचे संकेत शोधण्यासाठी आधुनिक आणि प्रगत उपकरणांचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. बेपत्ता नागरिक लवकर सापडावेत आणि त्यांची सुरक्षित सुटका व्हावी, यासाठी महाप्रभू जगन्नाथ यांच्याकडे प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

घराएवढे मोठे दगड हटविण्याचे आव्हान

ओडिशा अग्निशमन सेवा आणि होमगार्डचे महासंचालक सुधांशू सारंगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंजाम जिल्ह्यातील भंजनगर उपविभागात बचावमोहीम सुरू आहे. मात्र, घटनास्थळी जाण्यासाठी कंधमाल जिल्ह्याच्या बाजूने मार्गाचा वापर करावा लागत आहे.

भूस्खलनामुळे डोंगरावरील मातीचे मोठे थर आणि प्रचंड आकाराचे दगड घसरून घरांवर कोसळले आहेत. काही दगड घराएवढे मोठे असल्याने ते थेट हटविणे शक्य होत नाही. हे दगड बाजूला केल्याशिवाय मातीचा ढिगारा हटविणेही कठीण झाले आहे.

घटनास्थळाकडे जाणारा रस्ता अरुंद आणि चिखलमय असून पायी जाणेही अवघड आहे. त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच वेळ लागत आहे. पथकांच्या मुक्कामासाठी योग्य व्यवस्था नसल्याने मर्यादित वेळ काम केल्यानंतर त्यांना परतावे लागत आहे.

Cyclone Murasu: ‘मुरासु’ चक्रीवादळाचा कहर! आंध्र प्रदेशात ११० किमी वेगाने वारे, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

250 बचाव कर्मचारी, 100 मजूर तैनात

बचावकार्यासाठी अग्निशमन सेवा, रेल्वे कर्मचारी, ओडिशा आपत्ती जलद कृती दल (ओडीआरएएफ), ओडिशा पोलिस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकांसह विविध यंत्रणांचे सुमारे 250 कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत. त्यांना जवळपास 100 मजुरांची मदत मिळत आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून कुटुंबीयांनी त्याची ओळख पटवली आहे. कुटुंबीयांच्या विनंतीनुसार अंत्यसंस्कारही करण्यात आले. आणखी एक मृतदेह आढळला असला, तरी त्यावर मोठ्या प्रमाणात माती साचल्याने तो अद्याप बाहेर काढता आलेला नाही.

दरम्यान, बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण जिवंत असण्याच्या शक्यतेने शोधमोहीम सुरू आहे. बचावकार्यातील प्रगतीनुसार पुढील माहिती दिली जाईल, असे सारंगी यांनी स्पष्ट केले.

‘अर्णब’नंतर आता पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट; वातावरण बदलणार, जोरदार पाऊस होणार

28 ऑक्टोबरला झाले होते भीषण भूस्खलन

‘अर्नब’ चक्रीवादळामुळे झालेल्या असामान्य पावसाच्या पार्श्वभूमीवर 28 ऑक्टोबर रोजी ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील गिदिपाबली गावात भीषण भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेनंतर सुमारे 13 जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओडिशात भूस्खलनाची दुर्घटना कुठे घडली?

    Ans: ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील गिदिपाबली गावात 28 ऑक्टोबर रोजी भीषण भूस्खलन झाले.

  • Que: भूस्खलनानंतर किती जण बेपत्ता झाले होते?

    Ans: या दुर्घटनेनंतर सुमारे 13 जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली होती.

  • Que: आतापर्यंत किती मृतदेह सापडले आहेत?

    Ans: एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसरा मृतदेह आढळला आहे. मात्र, त्यावर मातीचा मोठा थर असल्याने तो अद्याप बाहेर काढता आलेला नाही.

Web Title: Odisha bhanjanagar landslide rescue operation missing people rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • Cyclone
  • Landslide
  • Odisha

संबंधित बातम्या

Cyclone Murasu: ‘मुरासु’ चक्रीवादळाचा कहर! आंध्र प्रदेशात ११० किमी वेगाने वारे, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती
1

Cyclone Murasu: ‘मुरासु’ चक्रीवादळाचा कहर! आंध्र प्रदेशात ११० किमी वेगाने वारे, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.