Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील 25 राज्यांना हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’; ओडिशा, आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा तडाखा

ओडिशा, आंध्र प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळाचा सर्वाधिक तीव्र परिणाम होईल, त्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंची रेल्वे वाहतूक थांबली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 30, 2026 | 07:15 AM
ओडिशामध्ये चक्रीवादळाचा कहर, रेल्वे पूल पाण्याखाली गेला

ओडिशामध्ये चक्रीवादळाचा कहर, रेल्वे पूल पाण्याखाली गेला

Follow Us
Follow Us:
  • बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ कमकुवत 
  • चक्रीवादळामुळे देशातील अनेक भागांत मोठे नुकसान 
  • ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना सर्वाधिक फटका 

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ कमकुवत झाले असले तरी, त्याने देशाच्या अनेक भागांमध्ये हाहा:कार माजवला आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. पूर आणि पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत जवळपास सहा जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, हवामान विभागाने शुक्रवारी देशभरातील 25 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळी पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 300 गावांमध्ये पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारने हेलिकॉप्टरद्वारे मदत आणि बचावकार्य सुरू करण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत जवळपास 30 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, शुक्रवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशभरातील २५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी ८५ किलोमीटर वेगापर्यंतचे सोसाट्याचे आणि धोकादायक वारे वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ओडिशा, आंध्र प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळाचा सर्वाधिक तीव्र परिणाम होईल, त्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंची रेल्वे वाहतूक थांबली आहे. अडकलेल्या प्रवाशांना रस्त्याने बाहेर काढण्याचे काम प्रशासन करत आहे.

गारपीट आणि भूस्खलनाचा धोका

याव्यतिरिक्त, अनेक डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे, तर उप-हिमालयीन बंगाल आणि पूर्व भारतात मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे आणि दक्षिण अंदमान समुद्राजवळ चक्रीवादळ तयार होत असल्यामुळे हवामान तीव्र राहण्याची शक्यता आहे.

शाळा बंद, जनजीवन विस्कळीत

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे एक रेल्वे पूल पाण्याखाली गेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, प्रतिकूल हवामान आणि मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर छत्तीसगडमधील १२ आणि ओडिशामधील १६ जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. चक्रीवादळामुळे दोन्ही राज्यांमध्ये हजारो झाडे उन्मळून पडली असून अनेक रस्ते आणि छोटे पूल वाहून गेले आहेत.

FAQ

प्र.1. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोणत्या राज्यांना बसला?

उ. ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना सर्वाधिक नुकसान झाले.

प्र.2. चक्रीवादळ कुठे निर्माण झाले होते?

उ. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते.

प्र.3. चक्रीवादळाची सध्याची स्थिती काय आहे?

उ. चक्रीवादळ कमकुवत झाले आहे; मात्र त्याचा परिणाम अनेक भागांत जाणवत आहे.

Web Title: Cyclone causes major damage in odisha and andhra pradesh nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 07:12 AM

Topics:  

  • Flood Issue
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
1

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Vasai Virar Flood Free : वसई-विरार शहराला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेचा ‘मास्टर प्लॅन’! 30 वर्षांचे व्हिजन समोर ठेवून सर्वेक्षण
2

Vasai Virar Flood Free : वसई-विरार शहराला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेचा ‘मास्टर प्लॅन’! 30 वर्षांचे व्हिजन समोर ठेवून सर्वेक्षण

राज्यातील हवामानात होतोय बदल; मराठवाडा, विदर्भ तापतोय तर कोकणात होते अतिवृष्टी
3

राज्यातील हवामानात होतोय बदल; मराठवाडा, विदर्भ तापतोय तर कोकणात होते अतिवृष्टी

IMD Rain Alert: चक्रीवादळाचे संकट? हवामान विभागाचा या 6 राज्यांना पावसाचा इशारा; जाणून घ्या कोणत्या राज्यांना अलर्ट
4

IMD Rain Alert: चक्रीवादळाचे संकट? हवामान विभागाचा या 6 राज्यांना पावसाचा इशारा; जाणून घ्या कोणत्या राज्यांना अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.