दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी उमर नबी याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
लाल किल्ला परिसरामधील दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. दहशतवादी डॉ. उमर उन नबी याने हा आत्मघाती हल्ला केला. गाडीमध्ये सापडलेल्या त्याच्या पायाचा डीएनए देखील मॅच झाला आहे. यामुळे हा हल्ला त्यानेच घडवून आणला असल्याचे सिद्ध झाले आहे. दहशतवादी डॉ. उमर उन नबी याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यावरुन त्याचे दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी डॉ. उमर उन नबी याचा व्हिडिओ समोर आला. यात उमर हा थेट सुसाईड बॉम्बिंगचे (आत्मघाती स्फोट) समर्थन करताना दिसत आहे.
Suicide Bombing isn’t Wrong Dr. Umar
Nabi recorded this video before blasting Guns make them terror!sts Education
makes them trained terror!sts. This video found by agency in the
phone of one of the arrested accused pic.twitter.com/I1MabzxyK8 — Adv. Homi Devang Kapoor (@Homidevang31) November 18, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दहशतवादी उमरच्या व्हिडिओमध्ये तो एका खुर्चावर बसून सेल्फी व्हिडिओ शूट करत आहे. त्याच्यामागे कपाटासारखे काही आहे, समोर ठेवलेल्या कॅमेऱ्यात थेट पाहून उमरने त्याचं बोलणं रेकॉर्ड केलं आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ” सर्वात मोठी गैरसमजूत म्हणजे, सुसाईड बॉम्बिंग किंवा आत्मघाती स्फोट, लोकांना ते समजत नाही. ते कोणत्याही प्रकारे लोकशाहीवादी नाही आणि कोणत्याही सुसंस्कृत समाजात ते स्वीकारार्ह नाही. त्या विरोधात अनेक विरोधाभास आणि अनेक तर्क आहेत.” असे तो म्हणाला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे उमर म्हणाला, ” आत्मघाती हल्ल्यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे , जेव्हा एखादी व्यक्ती असं मानतो की तो एखाद्या निश्चित स्थानी आणि निश्चित वेळी मरणार आहे, तेव्हा तो एका खतरनाक मानसिकतेत असतो. मृत्यू हीच आपली एकमेव मंजिल, एकमेव गंतव्य स्थन आहे, असं तो मानू लागतो. पण खरं सांगायचं तर वास्तव हे आहे की अशी विचारसरणी किंवा अशी परिस्थिती कोणत्याही लोकशाही आणि मानवीय व्यवस्थेत स्वीकारली जाऊ शकत नाही, कारण ती जीवन, समाज आणि कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे.” असे व्हायरल व्हिडिओमध्ये दहशतवादी उमर उन नबी म्हणाला आहे. त्याच्या या व्हिडिओवरुन तो अनेक दिवसांपासून या आत्मघाती हल्ल्याचे प्लॅनिंग करत असल्याचे दिसून आले.






