Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi: कॅन्सर, डायबीटीची होणार घरोरघरी तपासणी, केंद्र सरकारच्या देशव्यापी अभियानाची सुरुवात

देशात कॅन्सरचा वाढत चाललेला विळखा लक्षात घेत नागरिकांच्या आरोग्याबाबत आरोग्य विभाग सर्तक झालं आहे. वयवर्ष 30 आणि त्याहून जास्त असलेल्या नागरिकांची आता घरोघरी आरोग्य तपासणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 21, 2025 | 01:48 PM
कॅन्सर, डायबीटीची होणार घरोरघरी तपासणी, केंद्र सरकारच्या देशव्यापी अभियानाची सुरुवात

कॅन्सर, डायबीटीची होणार घरोरघरी तपासणी, केंद्र सरकारच्या देशव्यापी अभियानाची सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:

भारत हा तरुणांचा देश म्हणूनही ओळखला जातो. बदलत्या जीवनशैलीचा भाग किंवा इतर अन्य कारणांमुळे देशातील तरुणांना कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. भविष्यात कॅन्सच्या आजारामुळे तरुण पिढीवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेत केंद्र सरकारद्वारे याबाबत ठोस पाऊल उचलण्यात येत आहे. देशात कॅन्सरचा वाढत चाललेला विळखा लक्षात घेत नागरिकांच्या आरोग्याबाबत आरोग्य विभाग सर्तक झालं आहे. वयवर्ष 30 आणि त्याहून जास्त असलेल्या नागरिकांची आता घरोघरी आरोग्य तपासणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

देशात बहुतांश तरुणांना कमी वयातच मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोगाने ग्रस्त आहेत. हीच बाब लक्षात घेत आरोग्य विभागाच्यावतीने घरोघरी या आजारांबाबत तपासणी सुरु होणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. देशात कर्करोग, मधुमेह आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या किती आहे. याबाबतची तपासणी करण्यासाठी आरोग्य केंद्रातील कर्मचारी आता नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यासाठी घरोघरी येणार आहे.

व्यस्त आणि तणावग्रस्त Office Life मध्ये पसरत आहेत 6 जीवघेणे आजार, करू नका लक्षणांकडे दुर्लक्ष

इतके दिवस असणार आहे आरोग्य शिबिर ?

केंद्र सरकारच्या देशव्यापी अभियानाची सुरुवात फेब्रुवारीच्या 20 तारखेपासून ते संपूर्ण मार्च म्हणजेच महिनाभर असणार आहे. आयुष्यमान आरोग्य मंदिर (एएएम) आणि इतर आरोग्य केंद्रांवर याबाबत सखोल माहिती देण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व आरोग्य केंद्रांवर बीपी मॉनिटर्स, ग्लुकोमीटर आणि अत्यावश्यक औषधे यासारख्या अत्यावश्यक वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा करुन देणं सुनिश्चित करावी लागेल. चाचणी, उपचार आणि पाठपुरावा यांचा डेटा दररोज NP-NCD पोर्टलवर अपलोड केला जाईल.

डोकेदुखीचे सुद्धा असतात प्रकार, यातूनच मिळतात वेगवेगळ्या आजरांचे चिन्ह

याशिवाय आरोग्य शिबिराची अंमलबजावणी योग्य रित्या व्हावी यासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर अधिकार नेमण्यात येणार आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मंत्रालयाला दररोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहवाल प्रदान करतील, सतत देखरेख आणि तांत्रिक समर्थनास अनुमती देतील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (ICMR-NIN) च्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण मृत्युदरामध्ये NCDs चा वाटा 66टक्के आहे.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, तीव्र श्वसन रोग आणि कर्करोग यांसारखे आजार सध्या देशाच्या आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे. विशेषत: 30 आणिल त्यापेक्षा जास्त वयाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देणं हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेमुळे वेळेत आजाराचे निदान करत उपचार करण्यावर शासनाचे लक्ष केंद्रित आहेत. या उपक्रमामुळे आरोग्य सेवा खर्च कमी होईल आणि देशभरातील व्यक्तींचे जीवनमान सुधारेल असा विश्वास आरोग्य मंत्रालयाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Delhi door to door screening for cancer diabetes central governments nationwide campaign to begin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • Cancer prevention
  • delhi

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
2

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित
3

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी
4

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.