Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Delhi Riots 2020: 2020 मधील ईशान्य दिल्ली दंगल आणि 2019 मधील जामिया हिंसाचाराच्या स्वतंत्र किंवा SIT चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या. भडकाऊ भाषणांप्रकरणी नेत्यांवर FIR दाखल करण्याची तसेच निष्काळजीपणाबद्दल पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही न्यायालयाने मान्य केली नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 05, 2026 | 12:24 PM
दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय
  • SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
  • भडकाऊ भाषणांप्रकरणी FIRची मागणीही हायकोर्टाने फेटाळली
Delhi Riots 2020: ईशान्य दिल्ली 2020 मधील दंगल आणि 2019 मधील जामिया हिंसाचारासंदर्भातील विविध याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या घटनांची स्वतंत्र किंवा विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. यासोबतच भडकाऊ भाषणे करणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधात FIR नोंदवण्याची आणि कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही न्यायालयाने स्वीकारलेली नाही.

याचिकांमध्ये दिल्ली पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच कपिल मिश्रा आणि प्रवेश वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने संबंधित मागण्यांसह याचिका फेटाळल्या.

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम …

2020 मध्ये काय घडले होते?

फेब्रुवारी 2020 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीत तणाव निर्माण झाला होता. 23 फेब्रुवारीच्या आसपास जाफराबाद, मौजपूरसह अनेक भागांत हिंसाचार उसळला. दगडफेक, जाळपोळ आणि हिंसक संघर्षाच्या घटना अनेक दिवस सुरू राहिल्या. या हिंसाचारात आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्यासह 53 जणांचा मृत्यू झाला, तर 200 हून अधिक जण जखमी झाले. घरे, दुकाने, वाहने आणि धार्मिक स्थळांचेही मोठे नुकसान झाले.

जामिया हिंसाचार 2019

15 डिसेंबर 2019 रोजी CAA विरोधातील आंदोलनादरम्यान जामिया परिसरात परिस्थिती हिंसक बनली होती. दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. त्यानंतर पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याचे आरोपही करण्यात आले होते. आता या दोन्ही घटनांसंदर्भात SIT चौकशी, नेत्यांविरोधात FIR आणि संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईसाठी करण्यात आलेल्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्याने या प्रकरणात महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे.

पोलीस कारवाई आणि एनआयए चौकशीचीही मागणी

सीपीआय(एम) नेत्या वृंदा करात यांच्या याचिकेत पोलीस, आरएएफ आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांच्या कथित गैरवर्तन आणि निष्काळजीपणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसऱ्या एका याचिकेत सीएए-विरोधी आंदोलनांना दिलेल्या कथित निधीपुरवठा आणि समर्थनाची एनआयए चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी २०२० रोजी, सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनादरम्यान ईशान्य दिल्लीत जातीय हिंसाचार उसळला. यात किमान ५३ जण ठार झाले आणि जवळपास ७०० जण जखमी झाले. या हिंसाचारादरम्यान जाळपोळ आणि तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या.

Delhi Bomb Blast : दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला …

Web Title: Delhi high court dismisses petitions seeking sit probe fir over 2020 delhi riots and 2019 jamia violence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Court
  • delhi
  • police

संबंधित बातम्या

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
1

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
3

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
4

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.