Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: जंतरमंतरवरील तरुणांना अन्न पाणी पुरवणाऱ्या मोहम्मद जुनैदच्या कुटुंबियांचा पोलिसांकडून मानसिक छळ

मोहम्मद जुनैद यांचे वडील मुस्तफा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांव गंभीर आरोप केले आहेत. उत्तर प्रदेश पोलीस चौकशीच्या नावाखाली त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना सतत त्रास देत आहेत. पोलिसांच्या सततच्या त्रासामुळे जुनैदच्या आईची प्रकृती खूपच खालावली आहे

  • By anuradha sagar
Updated On: Jul 27, 2026 | 10:46 AM
Mohammad Junaid, Jantar Mantar, UP Police, Masuri Police, Jantar Mantar Food,

Mohammad Junaid, Jantar Mantar, UP Police, Masuri Police, Jantar Mantar Food,

Follow Us
Follow Us:
  • जंतर मंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना सातत्याने अन्न आणि पाणी पुरवले
  • उत्तर प्रदेश पोलीसांकडून चौकशीच्या नावाखाली त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांचा मानसिक छळ
  • बँक पासबुक आणि पॅन कार्डसह काही कागदपत्रे जप्त
CJP Protest Mohammad Junaid Family: मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नहल गावचा रहिवासी असलेला मोहम्मद जुनैद मलिक, दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना सातत्याने अन्न आणि पाणी पुरवल्यामुळे सध्या चर्चेत आहेत. मात्र, त्याच्या या कामामुळे मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नहल गावात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाच्या अडचणींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

मोहम्मद जुनैद यांचे वडील मुस्तफा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांव गंभीर आरोप केले आहेत. उत्तर प्रदेश पोलीस चौकशीच्या नावाखाली त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना सतत त्रास देत आहेत. पोलिसांच्या सततच्या त्रासामुळे जुनैदच्या आईची प्रकृती खूपच खालावली आहे. गेल्या काही दिवसांत युपी पोलिस सातत्याने त्यांच्या घरी येऊन चौकशी करत आहेत त्यांच्या कुटुंबीयांकडून कागदपत्रांची मागणी करत असल्याचा आरोप मुस्तफा जुनैद यांनी केला आहे.

E20 Janta Party: सोशल मीडियावर नव्या मोहिमेची चर्चा; E20 इंधनविरोधात X आणि Instagram वर मोहीम

वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले

“माझा मुलगा काहीही चुकीचे करत नाही. तो लोकांची सेवा करत आहे. तो लहानपणापासूनच लोकांना मदत करत आला आहे. पण २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मसुरी पोलीस आमच्या घरी आले होते. पोलिसांनी घरातील कागदपत्रांची तपासणी केली आणि आम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. तिथे आम्हालाआधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि इतर कागदपत्रांविषयी माहिती विचारण्यात आली,असाही आरोप मुस्तफा जुनैद यांनी केला आहे.

मेरठमधील मोठ्या बहिणीच्या सासरच्या मंडळींचीही चौकशी

चौकशीनंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना परत पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २४ जुलै रोजी, मुस्तफा यांना पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. २४ जुलैलादेखील दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. असा दावा केला जातो की, २४ जुलैच्या सकाळी पोलिसांनी मेरठमधील जुनैदच्या मोठ्या बहिणीच्या सासरच्या घरी भेट दिली आणि त्याच्या सासऱ्यांचीही चौकशी केली. त्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीचा व्यवसाय करते. जुनैदने नुकतेच एलएलबी पूर्ण केले आहे.

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम

जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान जुनैद अनेक आठवडे जुनैद केवळ व्यवस्थेचे काम पाहत होते.  पण आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात त्याचे नाव अचानक राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि तिथून पुढे त्यांच्या कुटुंबियांना मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे.  जुनैदने युपी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.  आंदोलनातील सहभागामुळे  उत्तर प्रदेश पोलिस  माझ्या घरी  गेले.   गाझियाबादमधील घराची झडती घेण्यात आली आणि  वडील मुस्तफा यांना चौकशीसाठी नेण्यात आले.  बँक पासबुक आणि पॅन कार्डसह काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. असाही आरोप जुनैद यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

मेरठमध्ये नातेवाईकांच्या छळाचे आरोपही

पोलिस इथेच थांबले नाही, त्यांनी मेरठमध्ये राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांचाही छळ केल्याचा आरोप जुनैद यांच्या कुटुबिंयांकडून करण्यात आला.  पण मेरठ पोलिसांनी हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात जुनैदच्या नातेवाईकांना ताब्यात घेतल्याची किंवा त्यांच्यावर कारवाई केल्याची कोणतीही नोंद आढळली नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

 आंदोलनाचा एक चेहरा, ज्याने कधीही माईक हातात घेतला नाही

विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान अनेक नेते आणि विद्यार्थी प्रतिनिधी मंचावरून भाषणे देत राहिले, पण जुनैद क्वचितच माईकवर दिसले. त्यांची भूमिका केवळ आंदोलनस्थळाचे व्यवस्थापन करण्यापुरती मर्यादित होती.

पण जसजसे आंदोलन पुढे सरकत गेले, तसतसे ‘जुनैद भाई’ हे नाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले. सलग ४९ दिवस संपावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या गरजांची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून अनेक आंदोलकांनी त्यांना स्मरणात ठेवले.

 

Web Title: Delhi jantar mantar protest mohammad junaid malik family up police harassment allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • Jantar Mantar
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
1

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
3

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा
4

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.