Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Parliament March LIVE: उपोषण सोडण्यास तयार पण…; सोनम वांगचुक यांच्या तीन अटी सरकार मान्य करणार का?

दिल्ली प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आदेशानुसार, जंतर-मंतर येथील अधिकृत आंदोलनस्थळ वगळता इतर ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, मोर्चे काढणे किंवा निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 20, 2026 | 09:31 AM
Sonam Wangchuk Hunger Strike End, Sonam Wangchuk Three Conditions,

Sonam Wangchuk Hunger Strike End, Sonam Wangchuk Three Conditions,

Follow Us
Follow Us:

 

CJP Parliament March LIVE: पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 20 जुलै रोजी आपले उपोषण संपवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये उपोषण सोडण्यासाठी तीन अटी नमूद करण्यात आल्या असून, त्यापैकी कोणतीही एक अट पूर्ण झाल्यास उपोषण समाप्त करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रातून उपोषण संपवण्याची घोषणा

सोनम वांगचुक यांनी पत्रात म्हटले आहे, “प्रिय मित्र आणि सहकारी, तुम्हांपैकी अनेकांनी मला माझे उपोषण कधी संपवणार, असा प्रश्न विचारला आहे. यापूर्वी समर्थकांना दिलेल्या माहितीनुसार, मी 20 जुलै रोजी माझे उपोषण संपवणार आहे.”

काय आहेत वांगचुक यांच्या तीन अटी ?

 

– सरकारने शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील अपयशांची, विशेषतः पेपरफुटीच्या घटनांची जबाबदारी स्वीकारावी.
– किंवा, मी आणि सीजेपीचे (CJP) नेतृत्व संसदेत पोहोचल्यानंतर विविध पक्षांचे खासदार आणि नेते हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन द्यावे.
– जर प्रकृती किंवा इतर कारणांमुळे संसदेत जाणे शक्य झाले नाही, तर विविध पक्षांचे खासदार आणि नेते रुग्णालयात येऊन वरील आश्वासने द्यावीत.

पत्राच्या शेवटी वांगचुक यांनी, “सफदरजंग रुग्णालयातील बेकायदेशीर नजरकैदेत असून माझ्या हालचाली, अभिव्यक्ती आणि संवादाच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत,”  असही म्हटलं आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलन कायम

दरम्यान, जंतर-मंतरवरील आंदोलन अद्याप सुरू असून, आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली असून, महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आंदोलनाला नवे वळण

उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्यानंतर सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही उपोषण सुरू केले आहे.  सीजेपीचा आज ( 20 जुलै) रोजी संसदेकडे मोर्चा काढण्यात येणार आहे.

दिल्लीत निर्बंध लागू

दिल्ली प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आदेशानुसार, जंतर-मंतर येथील अधिकृत आंदोलनस्थळ वगळता इतर ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, मोर्चे काढणे किंवा निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. संसदेचे अधिवेशन लक्षात घेऊन सार्वजनिक सुरक्षा आणि शासकीय आस्थापनांच्या संरक्षणासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

 

WHEN WILL I END THE FAST….!
Not withstanding my health my fast continues till after the Sansad Chalo March, and will be broken only under the following circumstances… pic.twitter.com/kaOGx2Nk4T
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 20, 2026

Web Title: Delhi jantar mantar protest sonam wangchuk announces to end hunger strike july 20 three conditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Cockroach Janta Party
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Cockroach Janta Party Sansad March Live: आम्हाला संसदेत जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही; अभिजीतचा एल्गार
1

Cockroach Janta Party Sansad March Live: आम्हाला संसदेत जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही; अभिजीतचा एल्गार

‘अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!’ भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ, जनतेची फसवणूक करत असल्याचा दावा
2

‘अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!’ भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ, जनतेची फसवणूक करत असल्याचा दावा

CJP चा संसद मार्च रखडणार? दिल्ली पोलिसांच्या ‘त्या’ मोठ्या अपडेटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!
3

CJP चा संसद मार्च रखडणार? दिल्ली पोलिसांच्या ‘त्या’ मोठ्या अपडेटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

‘मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा
4

‘मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’; अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.