
दिल्ली : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी देशभरामध्ये सुरु आहे. निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये चालू असून आज सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक जोरदार गाजली असून येत्या 4 जूनाला लागणाऱ्या निर्णयाकडे देशातूनच नाही तर जगभरातून लक्ष लागले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. या दोघांच्या मतदानामुळे इतिहास रचला गेला आहे. पहिल्यांदा गांधी कुटुंबियाने कॉंग्रेसला मतदान केलेले नाही.
कॉंग्रेस व आप हे मित्रपक्ष
यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून 400 पारचा नारा देण्यात आला आहे. तर देशातील जवळपास सर्व विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत रंगली. इंडिया आघाडीमध्ये कॉंग्रेससह आप देखील समाविष्ट झालेला आहे. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेल्या आपकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा कॉंग्रेसने दिल्लीतून उमदेवार जाहीर केलेला नाही. नाहीतर दरवर्षी कॉंग्रेस आणि आपकडून देखील उमेदवार जाहीर केला जात असे. यंदा कॉंग्रेस व आप हे मित्रपक्ष बनलेले आहेत. आणि सोनिया गांधी व राहुल गांधी हे दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे मतदार आहेत. त्यामुळे गांधी कुटुंबियाने कॉंग्रेसला मतदान न करता आपला मतदान केले आहे. या मतदानामुळे इतिहास रचला गेला आहे.
देशवासियों! पहले पांच चरणों के मतदान में आपने झूठ, नफ़रत और दुष्प्रचार को नकार कर अपने जीवन से जुड़े ज़मीनी मुद्दों को प्राथमिकता दी है। आज छठे चरण का मतदान है और आपका हर वोट सुनिश्चित करेगा कि: – युवाओं के लिए 30 लाख खाली सरकारी पदों पर भर्ती और 1 लाख रुपए साल की पहली नौकरी… pic.twitter.com/TvcmqSwXj3 — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 25, 2024
मतदानाचे आवाहन
इंडिया आघाडीच्या जागावाटपामध्ये आपकडे चार जागा आल्या आहेत. त्यामध्ये आपकडे नवी दिल्लीची जागा आली आहे. इंडिया आघाडीकडून आप नेते सोमनाथ भारती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदानाचे आवाहन केले. राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘तुमचे मत तुमचे जीवन तर सुधारेलच पण लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करेल. लोकशाहीच्या या महान उत्सवात आई आणि मी मतदान करून हातभार लावला. तुम्ही सर्वांनीही मोठ्या संख्येने घराबाहेर पडा, तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मतदान करा.’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.