Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Monsoon Session: पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधक आक्रमक! संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित

Parliament Monsoon Session: सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकारने पेपरफुटी करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा हे नवीन विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यावर, पेपरफुटीसाठी १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० कोटी रुपयांचा दंड होऊ शकेल.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 27, 2026 | 12:29 PM
Parliament Special Session, Women Reservation Bill, Delimitation

Parliament Special Session, Women Reservation Bill, Delimitation

Follow Us
Follow Us:
  • CJP आंदोलनाचे देशभरात पडसाद
  • लोकसभा आणि राज्यसभेत र्वजनिक परीक्षा (सुधारणा) विधेयक, २०२६ सादर
  • पेपरफुटीसाठी १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० कोटी रुपयांचा दंड
 

Parliament Monsoon Session:  कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने देशभरात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. पण त्याचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजावर पडल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला. परिणामी, लोकसभेचे कामकाज दोनदा तहकूब करम्यात आले. सकाळी कामकाज सुरू होताच संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतही विरोधी पक्षांनी मोठा गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू होताच पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी संसदेत आक्रमक भूमिका घेतल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यामुळे पुन्हा २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

CJP Protest: जंतरमंतरवरील तरुणांना अन्न पाणी पुरवणाऱ्या मोहम्मद जुनैदच्या कुटुंबियांचा पोलिसांकडून मानसिक छळ

दरम्यान, देशात पेपरफुटी रोखण्यासाठी मोदी सरकार आज संसदेत सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सार्वजनिक परीक्षा (सुधारणा) विधेयक, २०२६, लोकसभेत सादर करण्यात आले आहे. व्यापक विरोधी पक्षांच्या गदारोळात हे विधेयक सादर केले.

सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकारने पेपरफुटी करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा हे नवीन विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यावर, पेपरफुटीसाठी १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० कोटी रुपयांचा दंड होऊ शकेल.

इतकेच नाही, तर सेवा पुरवणारी कंपनी दोषी आढळल्यास, तिला ८ वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाईल. त्याचप्रमाणे, कंपनीचे संचालक किंवा व्यवस्थापक दोषी आढळल्यास, त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० कोटी रुपयांचा दंड होऊ शकेल. इतकेच नाही, तर पेपरफुटीमध्ये कोचिंग संस्थांचा सहभाग आढळल्यास, त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकाचा उद्देश परीक्षांची पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता मजबूत करणे हा आहे.

E20 Fuel Protest: E20 इंधनाविरोधात एल्गार; ४ ऑगस्टला संसदेला टॅक्सी संघटनांचा घेराव

सरकार आज संसदेत पेपरफुटीविरोधात अधिक कठोर कायदे करणारे विधेयक सादर करत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशातून पुन्हा एकदा उच्चाधिकार कार्यदलाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखालील ही सहा सदस्यीय समिती, पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारला शिफारसी देईल. तसेच, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याचे मार्गही सुचवेल.

सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकार पेपरफुटी माफियांवर कारवाई करण्याच्या तयारीत असताना, विरोधी पक्षही तयारी करत आहेत. या नवीन विधेयकावर इतर विरोधी पक्षांची भूमिका अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. इंडिया अलायन्सची बैठक आज सकाळी संसदेत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या केबिनमध्ये पार पडली. या बैठकीत, विरोधी पक्ष संसदेतील पेपरफुटी विरोधी कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकावर रणनीती आखण्यात आल्याची माहिती आहे.

 

Web Title: Parliament monsoon session cjp protest dharmendra pradhan resignation lok sabha rajya sabha adjourned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • INDIA Alliance
  • Monsoon Session of Parliament
  • national news

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! आज अनेक बँका राहणार बंद; विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर
1

मोठी बातमी ! आज अनेक बँका राहणार बंद; विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
2

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा
4

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.