फोटो सौजन्य - Social Media
प्रदूषणाच्या बाबतीत दिल्ली रेकॉर्ड करत चालली आहे. परंतु, आजच्या एअर क्वालिटी इंडेक्स (AQI)च्या अनुसार, ही पातळी थोडीसी घातली आहे. मुळात, दिल्लीमधील आज सकाळचा AQI २८३ नोंदवला गेला आहे. एक दिवसापूर्वी दिल्लीचा AQI ३०६ नोंदवला गेला होता. शहरात काही ठिकाणी प्रदूषणाची पातळी वाढत आहे. याचा त्रास तेथील रहिवाशांना होत आहे. जरी आज ही पातळी काही भागात मंदावली असली तरी ती स्थिती अतिशय दैनंनिय मानली जाते. वातावरणातील प्रदूषणामुळे श्वासासंबंधित त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आज जरी काही ठिकाणी AQI मध्ये घसरण पाहिली गेली असली तरी पुढील काही दिवसात हे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
हे देखील वाचा : लॉरेन्सच्या भावाचा तुरुंगातूनच खळबळजनक दावा; ‘सलमानने आम्हाला दिला होता कोरा चेक…’
सुंत्रानुसार, दिल्लीतील सर्वात कमी AQI चांदणीचौकमध्ये नोंदवण्यात आला आहे. दिल्लीतील आनंद विहार येथे AQI ३९० नोंदवला गेला आहे. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणे प्रदूषणाने अगदी प्रभावित असलेल्या क्षेत्रामध्ये येत आहेत. आनंद विहार तसेच दिल्लीतील जहांगीरपुरी, सोनिया विहार, विवेक विहार तसेच NSRT द्वारकावर प्रदूषणाने प्रचंड थैमान घातला आहे. तेथील नागरिकांना अनेक आरोग्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी, दिल्लीतील वायू गुणवत्ता अतिशय दूषित असल्याचे सांगण्यात आले होते. AQI ३४० नोंदवण्यात आला होता.
राजधानी दिल्ल्लीमध्ये रोज धुक्यासारखी चादर दिसून येत असली तरी ते धुके नसून प्रदूषण आहे. यांच्या वाढत्या प्रमाणाने राहीवादी हताश झाले आहेत. या प्रदूषणाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर तर होतोच आहे, त्याचबरोबर दिल्लीतील नद्याही याने त्रासले आहेत. गेल्या कित्येक काळापासून यमुनेच्या पृष्ठावर तयार झालेला पांढरा फेस वाढत चालला आहे. नदीच्या प्रदूषणाचा इंडेक्स कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत चालली आहे. दरम्यान, भारतात ‘दाना’ या चक्रीवादळाने ठोका दिला आहे. बंगालच्या उपसागरातून उत्पन्न झालेल्या या वादळाचा परिणाम भारतातील मोठमोठया शहरांच्या वातावरणावर तर जाणवणार आहे, त्याचबरोबर दिल्लीच्या वातावरणावरही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : हिमालयातील अभ्यासात मानवाच्या उत्क्रांतीबद्दल ‘ही’ आश्चर्यजनक बाब आली समोर; जाणून घ्या सविस्तर
दिल्लीतील विविध भागांमध्ये विविध AQI नोंदवले गेला आहे. अलीपूरमध्ये AQI ३१० नोंदवला गेला आहे. आनंद विहारमध्ये ३९० नोंदवला गेला आहे. तर बुराडीमध्ये ३१८ AQI नोंदवला गेला आहे. दिल्लीतील बवाना क्षेत्रात ३१४ AQI नोंदवला गेला आहे तर जहांगीरपुरीमध्ये AQI ३२१ नोंदवला गेला आहे. रोहिणी क्षेत्रात ३१० तर द्वारकामध्ये ३१९ AQI नोंदवला गेला आहे. जर AQI चे प्रमाण ३०१ ते ४०० च्या दरम्यान तर प्रदूषणाच्या या स्थितीला अतीशय भयंकर मानले जाते. दिल्लीतील चांदणीचौक येथे नोंदवण्यात आलेले AQI शहरातील सर्वात कमी १८७ इतके आहे, जे माध्यम क्ष्रेणीमध्ये येते.