Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्मेंद्र प्रधान यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला म्हटलं देशद्रोही; आता पुन्हा वादळ उठणार?

देशभरातील 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी कडक लष्करी आणि पोलिस बंदोबस्तात नीटची पुनर्परीक्षा घेण्यात आली, जी शिक्षणमंत्र्यांनी पूर्णपणे यशस्वी आणि पारदर्शक असल्याचे म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 24, 2026 | 11:10 AM
धर्मेंद्र प्रधान यांनी 'कॉक्रोच जनता पार्टी'ला म्हटलं देशद्रोही; आता पुन्हा वादळ उठणार?

धर्मेंद्र प्रधान यांनी 'कॉक्रोच जनता पार्टी'ला म्हटलं देशद्रोही; आता पुन्हा वादळ उठणार?

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलेल्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे. नीट पेपरफुटी आणि सीबीएसई पुनर्मूल्यांकन प्रकरणांमुळे वादात सापडलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला देशद्रोही म्हटले आहे. सीजेपी ही विघटनकारी घटकांची ‘बी-टीम’ असल्याचा आरोप प्रधान यांनी केला. ‘ज्यांना लोकशाहीत जनतेने नाकारले, ते आता वेष बदलून आले असून व्यवस्थेला लक्ष्य करत आहेत’, असे ते म्हणाले.

देशभरातील २२ लाखांहून अधिक उमेदवारांसाठी कडक लष्करी आणि पोलिस बंदोबस्तात नीटची पुनर्परीक्षा घेण्यात आली, जी शिक्षणमंत्र्यांनी पूर्णपणे यशस्वी आणि पारदर्शक असल्याचे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्र्यांनी आंदोलकांवर कडाडून टीका केली. त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेसलाही निशाण्यावर घेतले. धर्मेंद्र प्रधान यांनी आरोप केला की, राहुल गांधी नीट विवादाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना घाबरवत आहेत आणि देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करू इच्छितात.

PM Modi Cabinet : मोदींच्या कॅबिनेटमध्ये लवकरच फेरबदल ! BJP चा मेगा प्लान, UP मध्ये ‘सायकल’ तर पंजाबमध्ये ‘झाडू’ची सफाई

दरम्यान, जे लोक प्रदीर्घ काळ सत्तेत होते, त्यांनी केवळ जनतेचे शोषण केले आणि आता ते ‘ए’ किंवा ‘बी’ टीमच्या माध्यमातून देशाला बदनाम करण्याचे राजकारण करत आहेत, जे जनता चांगल्याप्रकारे ओळखून आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सीजेपीचे डायपर ड्राईव्ह

नीट पेपर लीकप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपी गेल्या चार दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सलग निदर्शने करत आहे. सीजेपीने मंगळवारी आपल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी एका अनोख्या ‘डायपर डोनेशन ड्राईव्ह’ची घोषणा केली. सीजेपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.

आंदोलनादरम्यान दिपकेंना झाली होती मारहाण

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये त्यांच्या आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची माहिती आहे. अभिजित दीपके रविवारी रात्री उशिरा जयपूरमध्ये दाखल झाले होते. जयपूर येथील शासकीय वसतिगृहात असलेल्या शहीद स्मारकाजवळ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काही अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी काही वेळासाठी  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Abhijit Dipke Jaipur Assault : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण

Web Title: Dharmendra pradhan called the cockroach janata party anti national

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Dharmendra Pradhan
  • political news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Cockroach Janata Party PC: ‘ज्ञानेश कुमार सर्वात मोठे देशद्रोही?’ अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
3

Cockroach Janata Party PC: ‘ज्ञानेश कुमार सर्वात मोठे देशद्रोही?’ अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.