Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून मोठ्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना त्यांनी युवा पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला.

  • By विवेक
Updated On: Aug 09, 2026 | 06:26 PM
Dharmendra Pradhan

Dharmendra Pradhan

Follow Us
Follow Us:
  • राजीनाम्यानंतर युवा पिढीच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा धर्मेंद्र प्रधानांची पहिली प्रतिक्रिया
  • आपण शेतकऱ्याचा मुलगा असून पदापेक्षा देश आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचं वक्तव्य.
  • NEET पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून राजीनाम्याची मागणी
 

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात मोठं आंदोलन झाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चर्चेत आला. विद्यार्थ्यांकडून आणि विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.

भुवनेश्वर येथील जीएम विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट केली. “युवा पिढीची दिशाभूल करण्यात आली. देश आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मी राजीनामा दिला,” असं त्यांनी म्हटलं.

‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’

धर्मेंद्र प्रधान यांनी काही लोकांकडून युवा पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला. भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने मुलांचा जन्म होतो आणि त्यांच्या भविष्यासाठी अनेक अपेक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं. “माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही,” असं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आणि देशाच्या हिताला प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं.

मनोज जरांगेंच्या ‘आमदार पाडू’च्या इशाऱ्यावर प्रवीण दरेकरांचं थेट चॅलेंज; म्हणाले, ‘उमेदवार उभे करा, क्षमता सिद्ध करा’

कार्यक्रमादरम्यान बाहेर काही बीजेडी कार्यकर्त्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना या घोषणाबाजीमुळे आपण अजिबात त्रस्त नसल्याचं त्यांनी सांगितलं.

‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, परत येईन’

आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत धर्मेंद्र प्रधान यांनी आपण शेतकऱ्याचा मुलगा असल्याचं सांगितलं. “मला परत जाण्यास सांगितलं तरीही मी परत जाणार नाही. मी परत येईन,” असं वक्तव्य त्यांनी केलं.

NEET पेपरफुटीप्रकरणी देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शिक्षणमंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलकांनी सरकारशी चर्चा करण्याची तयारी दाखवली असली तरी राजीनामा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतल्याचं या प्रकरणाच्या राजकीय चर्चेत सांगितलं जात होतं.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यात अचानक गोंधळ! कारवर दगडफेक, ‘चोर-चोर’च्या घोषणा

मोदी सरकारमधील महत्त्वाचा चेहरा

धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. ओडिशातील भाजपचा प्रमुख ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. केंद्रीय मंत्रिमंडळात दीर्घकाळ महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेल्या प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली. NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर वाढलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या या पहिल्या वक्तव्यामुळे NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Web Title: Dharmendra pradhan resignation neet paper leak first reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • BJP
  • Dharmendra Pradhan
  • neet paper leak

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
3

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
4

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.