Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणींत होणार वाढ; परराष्ट्र मंत्रालय ‘ही’ कारवाई करणार?

कर्नाटकच्या सरकारकडून या प्रकरणाच्या तपासासाठी 'एसआयटी' स्थापना केली आहे. तसेच काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहून रेवण्णा यांचा 'डिप्लोमॅटिक पासपोर्ट' रद्द करण्याची मागणी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2024 | 12:53 PM
खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणींत होणार वाढ; परराष्ट्र मंत्रालय ‘ही’ कारवाई करणार?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्याशी संबंधित लैंगिक छळाच्या आरोपांमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर खासदार रेवण्णा यांना पक्षातून निलंबन केलं. पण आता त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटक सरकारकडून या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापना केली आहे. तसेच काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहून रेवण्णा यांचा ‘डिप्लोमॅटिक पासपोर्ट’ रद्द करण्याची मागणी केली आहे.

कर्नाटक सरकारकडून प्रज्वल रेवण्णा यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी करणारे पत्र मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाला मिळाले आहे. या पत्रानंतर परराष्ट्र मंत्रालयानेही विशेष तयारी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून पासपोर्ट रद्द केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, हा पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रक्रियेत किती वेळ लागेल, याबाबत माहिती उपलब्ध नाही.

अनेक महिलांकडून लैंगिक छळाचा आरोप

लोकसभा निवडणुकीदरम्यान 33 वर्षीय प्रज्वल रेवन्ना यांच्या हजारो व्हिडिओ क्लिप समोर आल्या होत्या. रेवण्णावर त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणींवर बलात्कार आणि धमकावल्याचा आरोप होता. या व्हिडिओनंतर अनेक महिलाही पुढे आल्या आणि रेवण्णाने आपल्यासोबत अनेकदा चुकीचे कृत्य केल्याचा आरोप केला.

कोण आहेत प्रज्वल रेवण्णा?

प्रज्वल रेवण्णा हे कर्नाटकमधील हसन मतदारसंघाचे खासदार आहेत. प्रज्वल रेवण्णा यांचा राजकीय वारसाही मोठा आहे. जनता दल सेक्युलर पक्षाकडून 2019 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या मंजू ए. यांचा पराभव करत विजय मिळवला होता. प्रज्वल रेवण्णा भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे.

Web Title: Diplomatic passport of prajwal revanna may be canceled soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2024 | 12:51 PM

Topics:  

  • karnataka News
  • political news

संबंधित बातम्या

Satara News: मेढा सोसायटीत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची बाजी; डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर
1

Satara News: मेढा सोसायटीत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची बाजी; डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर

Kangana Ranaut: ‘राहुल गांधींची अवस्था त्या अस्वस्थ मांजरासारखी’; संसदेतील गदारोळावरून कंगना राणौत यांचा विरोधकावर घणाघात
2

Kangana Ranaut: ‘राहुल गांधींची अवस्था त्या अस्वस्थ मांजरासारखी’; संसदेतील गदारोळावरून कंगना राणौत यांचा विरोधकावर घणाघात

घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा सहभागही वाढला पाहिजे : मोहन भागवत
3

घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा सहभागही वाढला पाहिजे : मोहन भागवत

‘विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त, आवाज दाबण्यासाठी दडपशाहीचा वापर’; सोनिया गांधी यांचा हल्लाबोल
4

‘विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त, आवाज दाबण्यासाठी दडपशाहीचा वापर’; सोनिया गांधी यांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.