Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकणातील काही भाग आणि मराठवाड्यातीलही काही भाग यामध्ये आहेत. परंतु सर्वाधिक दुष्काळाची झळ विदर्भ आणि मराठवाड्याला बसली आहे. त्याचबरोबर उर्वरित खान्देशातील काही भागांनाही दुष्काळाचा फटका बसला आहे. म्हणून सरकारने तातडीने घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2026 | 03:09 PM
दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाने आणि महायुतीने आज दुष्काळाची जी घोषणा केली आहे, त्याचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे आणि आभारही मानले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे दौरे केले, त्या दौऱ्यांमध्ये त्यांना दुष्काळाची वास्तविक परिस्थिती जाणवली. काही लोकांचा असा संभ्रम होता की, ५ तारखेनंतर पंचनामे होतील आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर केला जाईल. पण सरकारने त्याची वाट न पाहता २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

५ तारखेनंतर पंचनामे होतील आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर केला जाईल. पण सरकारने त्याची वाट न पाहता २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. ‘२६५ तालुकेच का?’ असा अनेकांचा समज आहे. परंतु अनेक भाग असे आहेत, जिथे दुष्काळाची परिस्थिती नाही. उदाहरणार्थ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकणातील काही भाग आणि मराठवाड्यातीलही काही भाग यामध्ये आहेत. परंतु सर्वाधिक दुष्काळाची झळ विदर्भ आणि मराठवाड्याला बसली आहे. त्याचबरोबर उर्वरित खान्देशातील काही भागांनाही दुष्काळाचा फटका बसला आहे. म्हणून सरकारने तातडीने घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

दरम्यान, या संदर्भात येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत एकरी किती मदत द्यायची, याबाबत सविस्तर निर्णय घेतला जाईल. सर्व मंत्र्यांच्या संमतीने हा निर्णय मंगळवारी घेतला जाईल. मीदेखील सरकारचं अभिनंदन करतो. शरद पवारांच्या गटानेही या निर्णयाचं अभिनंदन केलं आहे. या दुष्काळावर जास्त राजकारण न करता, शेतकऱ्यांसाठी जो कोणी लढतोय, तो विरोधी पक्षातील असो किंवा सत्तेतील, त्याने शेतकऱ्यांचं हित पाहिलं पाहिजे. विरोधाला विरोध न करता शेतकऱ्याला मदत कशी मिळेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

उपाययोजना राबवण्याचा निर्णय

दुष्काळ जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते वीजबिल माफीपर्यंतच्या विविध उपाययोजनांचा त्यात समावेश केला जाईल. दुष्काळ म्हणजे फक्त पिकांचं नुकसान नाही, तर इतर बाबींचाही त्यात समावेश केला जातो. जेणेकरून शेतकऱ्यांना पूर्णपणे दिलासा मिळेल. हा ऐतिहासिक निर्णय सरकारने तातडीने घेतला आहे.

मराठवाड्यात 50 दिवसांचा पावसाचा खंड

मराठवाड्याला तर यामुळे दिलासा मिळणारच आहे. कारण या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे. आजच कोणकोणत्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, याची यादी जाहीर होईल. तेथील दाहकता तुम्हाला दिसेलच आणि जनतेलाही त्याची माहिती दिली जाईल. ज्ञानेश कुमार शहा हे निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत. त्यांच्या विरोधात त्यांच्या सहकाऱ्यांनीही मत नोंदवलं आहे. या संदर्भात कायदेशीरदृष्ट्या जे काही करता येईल, ते सरकार नक्कीच करत आहे. विरोधकांकडून अभियोग चालवला जाईल, असंही वक्तव्य करण्यात आलं आहे.

अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून महायुतीत खळबळ? बच्चू कडू, संजय शिरसाट यांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी

Web Title: Government has provided relief to farmers by declaring a drought says sanjay shirsat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • political news
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?
1

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध
3

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.