सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते अनावरण!

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने कायदेतज्ज्ञ डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तीन फूट उंचीच्या पायथ्याशी वकिलाच्या पोशाखात डॉ. आंबेडकरांचा सात फूट उंच पुतळा आहे.

    नवी दिल्ली : आज देशभरात संविधान दिन (constitution day ) साजरा करण्यात येत आहे.  संविधान दिनाचे औचित्य साधून रविवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar statue) पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (, President draupadi Murmu) यांच्या हस्ते बाबासाहेबांचा पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

    स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयात इतिहास रचण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गेल्य़ा अनेक दिवसापासून बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याची मागणी करण्यात येत होती.

    सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने कायदेतज्ज्ञ डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. डॉ. आंबेडकरांचा हा सात फूट उंच पुतळा आहे. त्यांच्या पुतळ्याला वकिलाप्रमाणे वेशभूषा केली असून त्यांच्या एका हातात संविधानाची प्रत आहे.

    सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात आतापर्यंत दोन पुतळे बसवण्यात आले आहेत. एक म्हणजे मदर इंडियाचे भित्तिचित्र, जे भारतीय वंशाचे ब्रिटिश कलाकार चिंतामणी कार यांनी तयार केले आहे. महात्मा गांधींचा दुसरा पुतळाही एका ब्रिटिश शिल्पकाराने बनवला होता. हा पुतळा मुर्तीकार नरेश कुमावत यांनी तयार केला आहे.