Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘E-20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान’; केंद्रातील बड्या सरकारी अधिकाऱ्याने केले मान्य

इथेनॉलमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. जुन्या गाड्या हवा आणि पेट्रोलच्या या नवीन मिश्रणाला आपोआप अॅडजस्ट करू शकत नाहीत, ज्यामुळे इंजिन लवकर आणि जास्त प्रमाणात तापू लागते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 19, 2026 | 12:02 PM
ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान

ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) व्ही. अनंत नागेश्वरन यांनी ‘ई-२०’ पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी जुन्या दुचाकी वाहनांसाठी पुन्हा ‘ई-१०’ पेट्रोलची विक्री सुरू ठेवण्याची शिफारस केली आहे. यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात स्पष्ट केले होते की, ई-२० पेट्रोलमुळे वाहनांच्या प्रकारानुसार आणि वयानुसार इंधनाचे मायलेज २ ते ६ टक्क्यांनी कमी होऊ शकते.

सरकारचा असा दावा आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवल्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीत मोठी घट झाली असून, देशाची अब्जावधी रुपयांची बचत झाली आहे. मात्र, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या मते, सध्या देशात सुमारे ८ कोटी जुन्या बाईक्स आणि स्कूटर्स आहेत, ज्या जुन्या कार्बोरेटर तंत्रज्ञानावर चालतात. हे कार्बोरेटर बीएस-४ इंजिन नियम लागू होण्यापूर्वी तयार करण्यात आले होते. आता सरकारने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळणे सुरू केले आहे.

SBI Q1 Results : स्टेट बँकेचा मोठा गल्ला, केली छप्परफाड कमाई! पहिल्या तिमाहीत 21121 कोटी रुपयांचा बंपर नफा

मोठी अडचण अशी आहे की, या जुन्या कार्बोरेटर असलेल्या गाड्या ई-२० पेट्रोलवर व्यवस्थित चालू शकत नाहीत. इथेनॉलमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. जुन्या गाड्या हवा आणि पेट्रोलच्या या नवीन मिश्रणाला आपोआप अॅडजस्ट करू शकत नाहीत, ज्यामुळे इंजिन लवकर आणि जास्त प्रमाणात तापू लागते. एवढेच नाही तर ई-२० पेट्रोलच्या वापरामुळे वाहनातील रबरी पाईप्स आणि अंतर्गत भाग हळूहळू वितळण्याचा किंवा होण्याचा धोका निर्माण होतो.

जनता आणि सरकार यांच्यातील तापलेला मुद्दा

ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी मिसळले जात असल्याच्या वृत्तांमुळे जनतेने सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. विरोधी पक्षानेही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण जेव्हा इंधनात पाणी आणि क्लोराईड मिसळले जाते, तेव्हा ते वाहनासाठी हानिकारक असते, कारण त्यामुळे इंधन पंप आणि इंजिनच्या भागांमध्ये गंज चढू शकतो. यामुळेच सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून थेट चौकशी केली आहे.

E20 Petrol : ई२० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी? सोशल मीडियावरील दाव्यांचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले सत्य; पाहा केला खुलासा

Web Title: E 20 petrol causes damage to vehicles says pms chief economic advisor v anantha nageswaran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Ethanol Petrol
  • Indian Inflation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.