Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ethanol Stove : महागड्या LPG सिलिंडरपासून होणार सुटका? एथेनॉलने स्वयंपाक करणं शक्य? सरकारची काय आहे योजना?

Ethanol Stove : गाड्यांमध्ये पेट्रोलसोबत एथेनॉलचे मिश्रण केल्यानंतर आता केंद्र सरकार स्वयंपाकासाठीही एथेनॉलचा एक पर्याय म्हणून विचार करत आहे. एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एथेनॉलवर चालणाऱ्या शेगडीची चाचणी आणि योजनेबाबत केंद्र सरकारने मोठा अपडेट दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 11, 2026 | 05:09 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महागड्या LPG सिलिंडरपासून होणार सुटका?
  • इथेनॉलने स्वयंपाक करणं शक्य?
  • सरकारची काय आहे योजना?
Ethanol Stove : भारतात सध्या जिथे तिथे फक्त इथेनॉलचाच बोलबाला ऐकायला मिळत आहे. सध्या इथेनॉलचा वापर प्रामुख्याने पेट्रोलमध्ये केला जात आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून e20 आणि भविष्यात 100% इथेनॉल पेट्रोल आणण्याचं प्रयोजन आहे. पेट्रोलची गरज भागवण्यासाठी आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देत आहे. पण हा मुद्दा आता फक्त पेट्रोल पुरता थांबला नाही तर आता भविष्यात स्वयंपाक घरातही इथेनॉल ( Ethanol Stove ) वापरला जाणार आहे. आपण वापरत असलेले LPG सिलेंडर हे कालबाह्य होऊन त्याची जागा इथेनॉल घेणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

सरकारने स्पष्ट केले आहे की, स्वयंपाकाचे इंधन म्हणून इथेनॉल वापरण्याची सध्या कोणतीही योजना नाही. याचा अर्थ असा की, एलपीजीला पर्याय म्हणून घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर इथेनॉल वापरण्याची सध्या कोणतीही योजना नाही. पण मग नेमकी कशा संदर्भात चर्चा झाली?

इथेनॉल स्टोव्हवर चर्चा

इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हबद्दल निश्चितच काही चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचा उल्लेख केला होता. हा स्टोव्ह इंधन तयार करण्यासाठी इथेनॉलचा वापर करतो. हा स्टोव्ह स्वयंपाकासाठी वापरला जाऊ शकतो आणि LPG ला एक किफायतशीर पर्याय म्हणून त्याचे कौतुक केले जात आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यावर भर

सरकार सध्या प्रामुख्याने वाहनांसाठी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने पेट्रोलच्या वापरातील त्याचा वाटा वाढतो. यामुळे देशाचा कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते.

LPG ला पर्याय देणे सोपे नाही

इथेनॉलवर स्वयंपाक करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असले तरी, LPG ला एक प्रमुख पर्याय म्हणून त्याचा वापर करण्यापूर्वी अनेक घटकांचा विचार करावा लागेल. यामध्ये इथेनॉलच्या किमती, पुरवठा, साठवणूक आणि स्टोव्हची सुरक्षितता यांसारख्या गोष्टींचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर हा पर्याय जनता स्वीकारणं फार गरजेचं आहे. त्यामुळे, सध्या घरगुती स्वयंपाकासाठी इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्याची कोणतीही सरकारी योजना नाही. वाहनांसाठी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्यावर सरकारचे लक्ष सध्या केंद्रित आहे.

Railway Porter Loot : कुलींची दादागिरी… प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये, तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय

Web Title: Ethanol stove cooking fuel government gives big update on project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • agriculture ministry
  • Central government
  • Ethanol Petrol
  • Ethanol Scam
  • gas
  • LPG Gas
  • Marathi News
  • Small Business

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.