Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! रॉबर्ट वाड्रांविरोधात आरोपपत्र दाखल, ईडीकडून १८ तास चौकशी

हरियाणातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधत आरोपपत्र दाखल केलं आहे. तब्बल १८ तास चौकशी करण्यात आली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 17, 2025 | 05:20 PM
मोठी बातमी! रॉबर्ट वाड्रांविरोधात आरोपपत्र दाखल, ईडीकडून १८ तास चौकशी

मोठी बातमी! रॉबर्ट वाड्रांविरोधात आरोपपत्र दाखल, ईडीकडून १८ तास चौकशी

Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हरियाणातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वड्रा यांच्याविरोधत आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्यासोबतच इतर अनेक लोक आणि कंपन्यांची नावेही त्यात समाविष्ट आहेत. हे प्रकरण सप्टेंबर २०१८ चे आहे, जेव्हा रॉबर्ट वड्रा, हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा, रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ आणि एका प्रॉपर्टी डीलरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये भ्रष्टाचार, बनावटगिरी आणि फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत.

Changur Baba ED : जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या छांगूर बाबावर EDची कारवाई; 14 ठिकाणांवर छापेमारी

वड्रा यांची कंपनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने २००८ मध्ये ३.५३ एकर जमिनीचा ७.५ कोटी रुपयांमध्ये व्यवहार केला होता. मात्र प्रकल्प पूर्ण न करता तेवढीच जमीन ५८ कोटी रुपयांना विक्री करण्यात आली. असा आरोप करण्यात आला असून रॉबर्ट वड्रा यांना आरोपी बनवण्यात आलं आहे. या प्रकरणात ईडीने वड्रा यांची १८ तासांहून अधिक काळ चौकशी केली. यासोबतच हरियाणातील इतर अनेक काँग्रेस नेत्यांचीही चौकशी करण्यात आली. हरियाणाच्या तत्कालीन भूपेंद्र सिंह हुडा सरकारने रॉबर्ट वड्रा यांच्या कंपनीला परवाना दिला होता, असा आरोप करण्यात आला आहे.

हुडा सरकारने निवासी प्रकल्पाचा परवाना डीएलएफला हस्तांतरित केला. या संपूर्ण व्यवहारात अनेक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. २०१८ मध्ये हरियाणा पोलिसांनी या व्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल केला. नंतर ईडीनेही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

आयएएस अशोक खेमका यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संबंधित या प्रकरणात अनियमितता उघड केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये ईडीने या प्रकरणात यूएईस्थित व्यापारी सीसी थंपी आणि युके शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी यांचे नातेवाईक सुमित चड्ढा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात वाड्रा आणि त्यांची पत्नी प्रियंका गांधी यांचे नाव आरोपी म्हणून नाही, परंतु त्यांच्या जमीन खरेदी-विक्रीचा तपशील समाविष्ट आहे.

BJP Politics : कोण होणार भाजपचा अध्यक्ष? धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांच्या नावांवर RSS मध्ये एकमत नाही

वाड्रा यांच्याशी संबंध असलेल्या थंपी यांनी २००५ ते २००८ दरम्यान दिल्ली-एनसीआरस्थित रिअल इस्टेट एजंट एचएल पहवा यांच्यामार्फत हरियाणाच्या फरीदाबादमधील अमीरपूर गावात सुमारे ४८६ एकर जमीन खरेदी केली होती. आरोपपत्रानुसार, रॉबर्ट वड्रा यांनी २००५-२००६ मध्ये एचएल पहवा यांच्याकडून अमीरपूरमध्ये ३३४ कनाल (४०.०८ एकर) जमीन खरेदी केली आणि डिसेंबर २०१० मध्ये तीच जमीन एचएल पहवा यांना विकली. ईडीच्या म्हणण्यानुसार, रॉबर्ट वड्रा यांच्या पत्नी प्रियांका गांधी वड्रा यांनी एप्रिल २००६ मध्ये हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यातील अमीरपूर गावात ४० कनाल (०५ एकर) शेती जमीन एचएल पहवा यांच्याकडून खरेदी केली आणि फेब्रुवारी २०१० मध्ये तीच जमीन एचएल पहवा यांना विकली, अशा ईडीचा आरोप आहे.

Web Title: Ed files chargesheet against robert vadra in shikohpur haryana land deal case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • Court
  • crime news
  • Haryana News

संबंधित बातम्या

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
1

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
2

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
4

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.