उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतराचे मोठे रॅकेट चालवणाऱ्या छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीनवर ईडीची 14 ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली (फोटो - सोशल मीडिया)
Changur Baba ED : उत्तर प्रदेश : कथित आणि स्वयंघोषित धर्मगुरु छांगूर बाबा याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमधील महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर करणे हे छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन याला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्यावर ईडीने करडी नजर ठेवली असून मोठा दणका दिला आहे. छांगूर बाबा याच्यासंबंधित 14 ठिकाणांवर ईडीने छापेमारी करुन कारवाई केली आहे. यामध्ये मुंबईसह उत्तर प्रदेशमधील ठिकाणांचा समावेश आहे.
छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन याने उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतराचे मोठे रॅकेट चालवले होते. यामध्ये त्याने विधवा, गरजू आणि अशिक्षित महिलांना लक्ष्य करत होता. त्याने शेकडो हिंदू महिलांचे मुस्लीम धर्मामध्ये धर्मांतर केले. यामधून त्याने 500 कोटींहून अधिक निधी मिळवला असल्याचा आरोप देखील केला जात आहे. हिंदू स्त्रियांचे मुस्लीम धर्मांतर केल्याप्रकरणी आणि त्यातून पैसे कमावल्याच्या आरोपाखाली छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन याला एटीएसने अटक केली होती. यानंतर आता छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन प्रकरणामध्ये ईडीची एन्ट्री झाली आहे.
#WATCH | Uttar Pradesh | Chhangur conversion case | The Enforcement Directorate is conducting searches at 14 premises, including 12 in Utraula, Balrampur, Uttar Pradesh, and two in Mumbai.
(Visuals from Balrampur) pic.twitter.com/EZfHnT6htZ
— ANI (@ANI) July 17, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन याच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याच्याशी संबंधित मुंबईसह 14 ठिकाणी छापेमारी केली आहे. पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमधील 12 आणि त्याचबरोबर मुंबई व वांद्रे य़ेथे छापेमारी केली आहे. धर्मांतराच्या नावाखाली एका बॅंक अकाऊंटवरुन दुसऱ्या बॅंक अकाऊंटवर दोन कोटी रुपये पाठवले असल्याचा संशय देखील ईडीने व्यक्त केला आहे. याचबरोबर छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन याचा सहकारी असलेला नितू उर्फ नसरीन आणि तिचा पती नवीन यांना देखील एटीएसने अटक केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात छंगूर बाबा हा पूर्वी अंगठ्या विकत होता. आता मात्र तो कोट्यधीश असून त्याच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबई आणि सौदी अरेबियाचा दौरा केल्यानंतर त्याच्या आयुष्यात हे परिवर्तन घडल्याचे सांगितलं जातं. मागच्या दशकात छांगूर बाबाने स्वतःला पीर बाबा किवा हजरत जलालुद्दीन असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छांगूर बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बलरामपूर आणि उत्तर प्रदेशमधील इतर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील पुण्यात अनेकठिकाणी मालमत्ता जमवल्या आहेत. ज्याची किंमत ३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. आरोपी छांगूर बाबाकडे अनेक आलिशान गाड्या, बंगले आणि तीन डझन मालमत्ता आहेत. यातील बहुसंख्या मालमत्ता त्याचे सहकारी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या नावाने नोंदणीकृत आहेत. यामुळे आता छंगूर बाबा हा ईडीच्या रडारवर आला आहे.