मुंबई : सणासुदीच्या काळात सर्वांच्याच घरी गोड आणि फराळाचे पदार्थ बनवले जातात. चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी तेलाचा (Refined Oil) जास्त वापर केला जातो. अशात ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. धान्याच्या किमतींनुसार काही तेलांचे दर वाढले तर काहींचे दर कमी झाले.
ऐन दिवाळी दसरा तोंडावर असताना अनेक मध्यमवर्गीयांच्या घरात वापरल्या जाणाऱ्या पामतेलाच्या किमतीही वाढल्यात. मोहरी सरकी आणि पामतेलाच्या किमती वाढल्यात, तर सोयाबीन, शेंगदाणा आणि रिफाईंड ऑइलच्या किमती कमी झाल्या आहे. तेलाच्या किमतीत 25 रुपयांपासून ते अगदी 100 रुपयांपर्यंत दर वाढले.
फराळ आणि विविध प्रकारची मिठाई बनवण्यासाठी तेलाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. यामध्ये मिठाईच्या दुकानात तसेच अनेक कुटुंबांमध्येही मोहरी, पाम आणि सरकी या तेलाचा जास्त वापर केला जातो. बाजारात वाढलेल्या मागणीमुळे या तेलाच्या किमती वाढत आहेत.
उत्पादनाच्या तुलनेत वाढली मागणी
देशात उत्पादनाच्या तुलनेत मागणी वाढल्याने दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोहरीच्या दरांत 100 रुपयांनी वाढ झाली. शुद्ध मोहरीच्या तेलात 45 रुपयांची वाढ झाली. कच्च्या पामतेलाच्या किमती देखील 100 रुपयांनी वाढल्यात. सरकी तेलाच्या किमती 25 रुपयांनी वाढसल्यात. सोयाबीन दाण्यांच्या तेलाच्या किमतीत घट झाली. यामध्ये 100 रुपयांची घट झाली.






