Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi: उमेदवाराला निवडणूक निकालांबद्दल प्रश्न असेल तर…; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना एका तासात सडेतोड उत्तर

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत हरयाणा निवडणुकीमध्ये प्रचंड व्होटचोरी झाल्याचा आरोप केला. यावर निवडणूक आयोगाने सडतोड उत्तर दिलं.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 05, 2025 | 03:36 PM
Election Commission Answer to Rahul Gandhi Alleges 25 Lakh Fake Voters in Haryana Elections H files

Election Commission Answer to Rahul Gandhi Alleges 25 Lakh Fake Voters in Haryana Elections H files

Follow Us
Follow Us:

Election Commission : नवी दिल्ली: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी एच फाईल दाखवून देशातील विविध राज्यांमध्ये मोठा घोळ होत असल्याचा आरोप केला. त्यांनी पुन्हा एकदा मतदार याद्यांमधील घोळ समोर आणून निवडणूक आयोगाची गोची केली. देशामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मतांची चोरी होत आहे. त्यांनी निवडणूक आयोग (ECI) आणि भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर १००% पुराव्यांसह प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली. यावर अवघ्या एका तासामध्ये निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणूक 2025 मध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे. कॉंग्रेसचा विजय होत असूनही पराभव दाखवण्यात आला असा आरोप राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केला आहे. बनावट फोटो म्हणजेच मतदार यादीतील ब्राझिलियन मॉडेलचा फोटो, इतर राज्यातील भाजप नेते/कार्यकर्त्यांनी मतदान करणे, अस्पष्ट फोटोंचा वापर – कोणालाही मतदान करायला लावणे, मतदार वगळणे – मतदार यादीतून नावे काढून टाकणे आणि घर क्रमांक ० – आम्ही पुरावे दिले की घराच्या मालकाकडेही घर क्रमांक ० आहे. हरियाणात बेकायदेशीर सरकार आणि भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. हरियाणात काँग्रेसने निवडणूक जिंकली, तर भाजपचा पराभव झाला, असे आरोप राहुल गांधींनी केले आहे, या सर्व आरोपांवर निवडणूक आयोगाने एका तासामध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

हरियाणाच्या ९० विधानसभा जागांवर उच्च न्यायालयात फक्त २२ निवडणूक याचिका प्रलंबित आहेत. नियमांनुसार, कोणत्याही पक्षाचा कोणताही उमेदवार मतदार यादीत किंवा निवडणुकीत अनियमितता असल्याचे मानत असल्यास तो अपील दाखल करू शकतो, परंतु काँग्रेस पक्षाने एकही अपील दाखल केलेले नाही, अशी माहिती समोर आली आहे. नियमांनुसार, जर एखाद्या उमेदवाराला निवडणूक निकालांबद्दल प्रश्न असेल तर तो उच्च न्यायालयात जाऊ शकतो. हरियाणा निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात २२ अपील प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, काँग्रेसचे मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रांवर काय करत होते असा प्रश्नही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विचारला. जर एखाद्या मतदाराने आधीच मतदान केले असेल किंवा मतदान एजंटला मतदाराच्या ओळखीबद्दल शंका असेल, तर त्यांनी आक्षेप नोंदवायला हवा होता, असेही त्यांनी म्हटले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

त्याचबरोबर बोगस मतदारांच्या राहुल गांधींच्या आरोपांवरही निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. , काँग्रेसच्या बीएलए यांनी मतदारयादीवर आपला आक्षेप का नोंदवला नाही. जरी हे बनावट मतदार असले तरी, त्यांनी भाजपला मतदान केले असे कसे म्हणता येईल? असा सवालही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Election commission answer to rahul gandhi alleges 25 lakh fake voters in haryana elections h files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Election Commission
  • haryana election
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Congress Protest against ECI: ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोगाची तयारी! काँग्रेसचा देशव्यापी मोर्चा, विरोधी पक्ष आक्रमक
1

Congress Protest against ECI: ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोगाची तयारी! काँग्रेसचा देशव्यापी मोर्चा, विरोधी पक्ष आक्रमक

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
3

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात
4

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.