Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराण-इस्रायल युद्धाच्या छायेतून ‘जग लाडकी’ सुखरूप मुंद्रा बंदरात; 80,886 टन कच्चे तेल भारतात दाखल

इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर 'जग लाडकी' हे भारतीय जहाज ८०,८८६ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन मुंद्रा बंदरात पोहोचले आहे. भारताच्या कूटनीतीचे हे मोठे यश मानले जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 18, 2026 | 04:51 PM
इराण-इस्रायल युद्धाच्या छायेतून 'जग लाडकी' सुखरूप मुंद्रा बंदरात (photo Credit- X)

इराण-इस्रायल युद्धाच्या छायेतून 'जग लाडकी' सुखरूप मुंद्रा बंदरात (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • कच्च्या तेलाचा साठा घेऊन ‘जग लाडकी’ टँकर मुंद्रा बंदरात दाखल
  • UAE कडून 80 हजार मेट्रिक टन ऑइलची आयात
  • पंतप्रधान मोदींची यशस्वी शिष्टाई आणि कूटनीतिक विजय
मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्याचे संकट उभे ठाकले असताना, भारतासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय ध्वज असलेले ‘जग लाडकी’ (Jag Ladki) हे कच्चे तेल वाहून नेणारे जहाज गुजरातच्या मुंद्रा येथील अदानी पोर्टवर यशस्वीरीत्या दाखल झाले आहे. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’चा (Strait of Hormuz) अडथळा पार करून हे जहाज भारतात पोहोचल्याने देशांतर्गत इंधन पुरवठ्यावरील ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

80 हजार मेट्रिक टन क्रूड ऑइलसह 22 नाविक सुरक्षित

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘जग लाडकी’ या टँकरमध्ये संयुक्त अरब अमिरातीतून (UAE) मागवलेले सुमारे 80,886 मेट्रिक टन कच्चे तेल आहे. हे तेल फुजैराह बंदरात लोड करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या जहाजावर 22 भारतीय नाविक कार्यरत असून, ते सर्वजण सुखरूप मुंद्रा बंदरात पोहोचले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून युद्धग्रस्त क्षेत्रात अडकलेल्या 28 भारतीय जहाजांपैकी हे चौथे जहाज आहे, ज्याने यशस्वीरीत्या भारतात पुनरागमन केले आहे.

#WATCH भारतीय झंडे वाला क्रूड ऑयल टैंकर ‘जग लाडकी’ गुजरात में अडानी पोर्ट्स मुंद्रा पहुंचा। इसमें UAE से मंगाया गया लगभग 80,886 मीट्रिक टन (MT) क्रूड ऑयल था, जिसे फुजैराह पोर्ट पर लोड किया गया। (वीडियो सोर्स: अडानी पोर्ट) pic.twitter.com/b52Wki0MjN — ANI_HindiNews (@AHindinews) March 18, 2026

Bihar New CM: बिहारच्या राजकारणात सत्तांतराचे वारे: नितीश कुमारांनी दिले भावी मुख्यमंत्र्यांचे संकेत

पंतप्रधान मोदींची यशस्वी शिष्टाई आणि कूटनीतिक विजय

‘जग लाडकी’चे भारतात येणे ही केवळ एक व्यावसायिक घटना नसून, तो भारताचा मोठा कूटनीतिक विजय मानला जात आहे. युद्धाच्या या भीषण परिस्थितीतही भारताचे इराणसह या क्षेत्रातील सर्वच देशांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध कामी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींशी केलेल्या थेट चर्चेनंतरच या जहाजांच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने दाखवलेला संयम आणि सातत्यपूर्ण संवादामुळेच ही मोठी यशप्राप्ती झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हॉर्मुझ सामुद्रधुनी आणि जागतिक ऊर्जा संकट

‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ हा इंधन व्यापाराच्या दृष्टीने जगातील सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जगातील सुमारे 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच अरुंद मार्गावरून होते. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे इराणने हा मार्ग सध्या बंद केला आहे, ज्याचा परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर झाला आहे. या संकटामुळे गेल्या एका महिन्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जहाज सुरक्षितरीत्या बाहेर पडणे, हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश अधोरेखित करते.

देशांतर्गत इंधन पुरवठ्याला मिळणार बळ

‘जग लाडकी’ पाठोपाठ आणखी दोन जहाजे लवकरच भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. या यशामुळे देशातील कच्च्या तेलाचा साठा वाढणार असून, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवणे सरकारला शक्य होईल. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत भारताची ही पावले जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता आणि शक्ती वाढवणारी ठरली आहेत.

LPG चा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले! देशभरात 12,000 हून अधिक छापे; 15,000 गॅस सिलेंडर्स जप्त

Web Title: Emerging from the shadow of the iran israel conflict the jag ladki arrives safely at mundra port

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • crude oil
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…
1

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…

Ethanol Blending: Petrol मध्ये 25% इथेनॉल? तेल संकटात भारताचा ‘हा’ मेगाप्लॅन तुमच्या गाड्यांवर करणार मोठा परिणाम?
2

Ethanol Blending: Petrol मध्ये 25% इथेनॉल? तेल संकटात भारताचा ‘हा’ मेगाप्लॅन तुमच्या गाड्यांवर करणार मोठा परिणाम?

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल
3

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल

Russian Oil : भारत रशिया मैत्रीत मिठाचा खडा? सवलत बंद करुन रशियाने वाढवले तेलाचे भाव
4

Russian Oil : भारत रशिया मैत्रीत मिठाचा खडा? सवलत बंद करुन रशियाने वाढवले तेलाचे भाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.