Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडिया आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी; मतदानानंतर खर्गेंच्या घरी सर्व नेते उपस्थित; वाचा नेमकं काय घडलं

  • By युवराज भगत
Updated On: Jun 01, 2024 | 07:31 PM
India Alliance meeting

India Alliance meeting

Follow Us
Close
Follow Us:

India Alliance Meeting : इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीचे सर्वच नेते जमले होते. यावेळी निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला 15 पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला कुणालाही पाठवलं नव्हतं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

The INDIA alliance leaders' meeting at Congress President Shri @kharge’s residence in New Delhi today. pic.twitter.com/ykBQP4tSlI

— Congress (@INCIndia) June 1, 2024

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी आघाडीचे सर्वच नेते

दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एक्झिट पोलचा कौल येण्यापूर्वी इंडिया आघाडीत मोठ्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी इंडिया आघाडीचे सर्वच नेते जमले होते. निवडणुकीच्या निकालाबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला फक्त टीएमसीचे नेते नव्हते. इतर सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खर्गे यांचा मोठे विधान

निवडणूक निकालानंतर काय करायचं? त्यावेळची रणनीती काय असेल? याचा विचार या बैठकीत करण्यात आला. तसेच सत्ता आली नाही तर काय करायचं? यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठं विधान केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी थेट पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे.

राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे पहिली पसंत

इंडिया आघाडीचं सरकार बनल्यास राहुल गांधी हेच आमचे पंतप्रधानपदाचे पहिली पसंत असतील, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढावी म्हणून आम्ही भरपूर आग्रह धरला होता. पण प्रियंका गांधी यांनीच निवडणूक लढण्यास नकार दिला, असं खरगे यांनी सांगितलं.

बैठकीत कोण कोण?
इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

15 पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित

तेजस्वी यादव यांच्यासोबत व्हीआयपी चीफ मुकेश साहनी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. मुकेश साहनी हे इंडिया आघाडीच्या बैठकीला पहिल्यांदा हजर राहिले आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि झारखंडचे मुख्यमंत्री चपंई सोरेन यांनीही या बैठकीला हजेरी लावली होती.

महत्त्वाच्या नेत्यांना बैठकीला बोलावलं
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीने महत्त्वाच्या नेत्यांना बैठकीला बोलावलं होतं. या बैठकीसाठी एकूण 15 पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं.

हे नेते उपस्थित
INC- सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल NCP (pawar)- शरद पवार, जितेंद्र आह्वाड DMK- टी आर बालू Shiv Sena (UBT)- अनिल देसाई AAP-केजरीवाल, भगवंत मान, राघव चड्ढा RJD-तेजस्वी यादव TMC- गैरहजर CPM- सीताराम येचुरी JMM-चम्पई सोरेन, कल्पना सोरेन NC-फारुख अब्दुल्ला PDP- गैरहजर, पण पाठिंबा SP-अखिलेश यादव CPI- डी राजा CPI(ML)- दीपंकर भट्टाचार्य VIP (new entry)- मुकेश सहनी

Web Title: Even before the lok sabha exit polls 2024 huge developments in delhi all india aghadi leaders at kharges house what exact happened nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2024 | 07:27 PM

Topics:  

  • Mallikarjun Kharge
  • Prime Minister Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
1

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
2

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
3

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल
4

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.