पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटात (Pakistan financial crisis) सापडला आहे. लोकांचे खाण्या पिण्याचे वांधे झाले आहेत. याला सध्याची ढासळलेली आर्थिक व्यवस्था कारणीभूत असली तरी यामागेही अनेक कारणे आहेत. 1947 पासून पाकिस्तान हा राजकीय अस्थिरतेचा बळी ठरला आहे. आर्थिक सुधारणांना कधीच सरकारचे प्राधान्य राहिले नाही. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी पाकिस्तानला कट्टरवाद्यांच्या हातातील बाहुले बनू दिले. त्यामुळे अशी वेळ ओढवली आहे. ही परिस्थिती सुधारुन जगाच्या सोबत चालायच असेल तर ‘मोहम्मद अली जिना (muhammad ali jinnah) आणि मोहम्मद इक्बाल (mohmmad Iqbal) यांना विसरुन समोर जा असं, एका माजी गुंतवणूक तज्ज्ञाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला हा सल्ला दिला होता.
[read_also content=”तुर्कस्तान-सीरियातील भूकंपात मृतांचा आकडा पोहोचला 100 पार! दोन्ही देशांमध्ये विध्वंस, मृतांचा आकडा वाढण्याची भिती https://www.navarashtra.com/world/turkey-syria-earthquake-death-toll-reaches-100-nrps-367653.html”]
ब्रिटनचे युसूफ नजर म्हणाले की, ‘मोहम्मद अली जिना आणि मोहम्मद इक्बालदोन्ही नेत्यांनी पाकिस्तानला धार्मिक आधारावर पाठिंबा दिला. हे 2023 आहे आणि बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. जे देश बदल स्वीकारत नाहीत, ते मागे राहतात. काय, केव्हा आणि कसे घडले याचा विचार इस्लामाबादने करायला हवा, असे ते म्हणाले. यामध्ये युसूफ नजर यांनी इतिहासाचा हवाला देत पाकिस्तानच्या आर्थिक दुर्दशेच्या कारणांवर प्रकाश टाकला आहे.
नाझर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘देश भरकटतात आणि त्यांच्या चुका सुधारतात. पण ते ते केवळ आत्मनिरीक्षण आणि मुक्त संवादातून करतात, कट्टरता नाही. 1948-1971 बद्दल बरेच काही लिहिता येईल. त्यांनी लिहिले, ‘शिक्षणावरील खर्च पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात खालच्या पातळीवर आला आहे. 25 वर्षांपूर्वी पाकिस्तानचा दरडोई जीडीपी भारताच्या तुलनेत 46 टक्क्यांनी जास्त होता, पण आता तो 20 टक्क्यांनी जास्त आहे.
कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेला पाकिस्तान आता पूर्णपणे कंगाल झालेल्या स्थितीत (Pakistan Economic Crisis) पोहचलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची आयात करण्याइतपतही पाकिस्तानकडे परदेशी मुद्रा भंडार (Foreign Currency ) राहिलेले नाही. देशात महागाईनं (Inflation) कहर केला असून, लोकं दोन वेळच्या अन्नासाठी शोधाशोध करीत असल्याचं दिसत आहे.