Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी

स्लीपर बस बिकानेरहून जयपूरला जात होती, तर ट्रक जयपूरहून बिकानेरला येत होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 10, 2025 | 07:23 AM
राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी

राजस्थानच्या फतेहपूरमध्ये बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू तर 18 जण जखमी

Follow Us
Close
Follow Us:

सिकर : राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील फतेहपूर भागात मंगळवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. फतेहपूर-बिकानेर महामार्गावर एक स्लीपर बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 18 जण जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

या अपघाताची माहिती मिळताच फतेहपूर सदर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर बस बिकानेरहून जयपूरला जात होती, तर ट्रक जयपूरहून बिकानेरला येत होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली, ज्यामुळे घटनास्थळी परिस्थिती भीषण बनली. या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे मृतदेह फतेहपूर रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहेत. अपघातात १८ जण जखमी झाले आहेत, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

हेदेखील वाचा : Nashik Accident: देवीची भेट घेतली अन् क्रूर नियतीशी गाठ पडली! सप्तशृंगी गडाजवळ कार दरीत कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू

दरम्यान, जखमींना तातडीने फतेहपूर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारानंतर, १८ गंभीर जखमींपैकी सात जणांना चांगल्या उपचारांसाठी सिकर येथे रेफर करण्यात आले. उर्वरित जखमींवर फतेहपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा

या अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे पाहिला मिळाले. या अपघाताची माहिती मिळताच, पोलिसही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था पूर्ववत केली. आता संपूर्ण घटनेचा तपास केला जात आहे. अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

चित्तोडगड-कोटा राष्ट्रीय महामार्गावरही अपघात

राजस्थानमधील चित्तोडगड-कोटा राष्ट्रीय महामार्ग २७ वरही एका भीषण अपघात झाला. हा अपघात चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारण, यामध्ये चालकाने अनियंत्रितपणे वाहन चालवल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर हा अपघात झाला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

हेदेखील वाचा : Gadchiroli Crime: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचा भीषण अपघातात मृत्यू; गडचिरोली येथील घटना

Web Title: Fatal accident between bus and truck in fatehpur rajasthan 3 people died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 07:11 AM

Topics:  

  • Accident News
  • Rajasthan News

संबंधित बातम्या

टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्…; कारमधील तिघे जखमी
1

टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, दोनशे फूट पुढे गेली अन्…; कारमधील तिघे जखमी

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी
2

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

MP Prashant Padole Accident: प्रशांत पडोलेंच्या कारला भीषण अपघात! नागपूरजवळ नेमकं काय घडलं?
3

MP Prashant Padole Accident: प्रशांत पडोलेंच्या कारला भीषण अपघात! नागपूरजवळ नेमकं काय घडलं?

Prashant Padole Accident : काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; एअरबॅग उघडल्या नाहीच अन्..
4

Prashant Padole Accident : काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; एअरबॅग उघडल्या नाहीच अन्..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.