सप्तशृंगी गडाजवळ कार दरीत कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू (Photo Credit - X)
दर्शन करून परतताना दुर्दैवी घटना
दर रविवारी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक गर्दी करतात. त्याचप्रमाणे पाच भाविकांची इनोव्हा कार देवीचं दर्शन घेऊन खाली परतत होती. याचदरम्यान घाटातील एका ठिकाणी चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने संरक्षण कठडा तोडून थेट खोल दरीत उडी घेतली.
पहाड़ों पर गाड़ी चलाते वक्त हमेशा सावधान रहना चाहिए। एक गलती जिंदगी पर भारी पड़ जाती है। महाराष्ट्र के नासिक में एक परिवार मंदिर से दर्शन कर घर लौट रहा था। इसी दौरान वनी में गणेश प्वाइंट के पास इनोवा कार अनियंत्रित होकर खाई में गिर गई और 5 लोगों की मौत हो गई। खाई कितनी गहरी है… pic.twitter.com/FRnewf9O4H — Satyandra kumar Yadav (@ysatyandra) December 7, 2025
अपघाताचे कारण आणि मृतांची ओळख
मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा कार घाट मार्गावर ओव्हरटेक करत असताना अचानक नियंत्रण सुटल्यामुळे ती दरीत कोसळली. कीर्ती पटेल (५०), रसीला पटेल (५०), विठ्ठल पटेल (६५), लता पटेल (६०), पचन पटेल (६०) आणि मणिबेन पटेल (६०). असे अपघातात मृत्यु झालेल्या मृत झालेल्यांची नावे आहे. मृत झालेले सर्व भाविक हे पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असून ते एकमेकांचे नातेवाईक होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, सप्तशृंगी गड आपत्ती व्यवस्थापन दल आणि ग्रामपंचायतीचे सदस्य तातडीने घटनास्थळी पोहोचले.
८०० फूट खोल सरळ दरीत गाडी कोसळली
कार ज्या ठिकाणी कोसळली, ती जागा अतिशय धोकादायक आणि सुमारे ८०० फूट खोल सरळ दरी असल्याने बचाव पथकाला खाली उतरण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. अपघातात मृत पावलेल्या भाविकांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत बाहेर काढता आले नव्हते. नाशिकहून अतिरिक्त बचाव पथक बोलावण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे.
स्थानिक नागरिकांचा PWD वर गंभीर आरोप
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. घाटाच्या या वळणावर रस्ता अत्यंत खराब आहे आणि अनेक वेळा तक्रार करूनही तो दुरुस्त केला गेला नाही. रस्त्याची ही खराब स्थितीच या भीषण दुर्घटनेला मोठे कारण ठरली, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.






