मध्यप्रदेशात मतदानादरम्यान गालबोट; बसप उमेदवारावर जीवघेणा हल्ला, फेरमतदानाची केली जातीये मागणी

मध्यप्रदेशात मतदानादरम्यान (MP Election) अनेक घटना उघडकीस आल्या. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर लाठीमार करण्यात आला. असाच एक प्रकार ग्वाल्हेर शहरातून समोर आला आहे. एका बसपा नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

    ग्वाल्हेर : मध्यप्रदेशात मतदानादरम्यान (MP Election) अनेक घटना उघडकीस आल्या. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर लाठीमार करण्यात आला. असाच एक प्रकार ग्वाल्हेर शहरातून समोर आला आहे. एका बसपा नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. उमेदवाराच्या बाजूने जाणाऱ्या वाहनांवर लाठ्या, रॉड, दगडांनी हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा आणि उमेदवाराचे समर्थक घटनास्थळी दाखल झाले.

    बसपा उमेदवार सुरेश बघेल यांच्यावर नौगाव येथील मतदान केंद्र 93 वर हा हल्ला झाला. बघेल यांनी काँग्रेसचे उमेदवार साहेब सिंह गुर्जर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय मतदानादरम्यान बूथ कॅप्चर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे आणि पुन्हा मतदानाची मागणीही केली आहे.

    बोगस मतदानाचा दावा बघेल यांनी सांगितले की, त्यांना ग्वाल्हेरच्या नौगाव येथील मतदान केंद्र 93 वर बनावट मतदानाची माहिती मिळाली. या माहितीची सत्यता जाणून घेण्यासाठी ते मतदान केंद्रावर पोहोचले असता, प्रत्यक्षात बनावट मतदान होत असल्याचे त्यांना समजले. ओळखपत्र घेतले जात नव्हते. याबाबत पीठासीन अधिकान्याशी बोलले असता त्यांनी असे काहीही घडत नसल्याचे सांगितले. बनावट मतदानाचा पुरावा दिला असता त्यांनी असे होणार नसल्याचे सांगितले.

    तक्रार करूनही खोटी मते टाकली

    तक्रार केल्यानंतर ते तेथून निघून गेल्याचे उमेदवार बघेल यांनी सांगितले. यानंतर माझे पोलिंग एजंट वाळू बघेल आणि ब्रिजेश बघेल यांना खोलीत बंद करून पुन्हा बनावट मतदान करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.