Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.

Food Scam : नवी दिल्लीतील द ललित हॉटेलमधून घेतलेला नेस्लेच्या लो-फॅट डेअरी व्हाईटनरचा नमुना FSSAIच्या प्रयोगशाळा तपासणीत ‘असुरक्षित’ आणि ‘निकृष्ट’ आढळला. संबंधित उत्पादनाची विक्री तातडीने थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र नेस्ले इंडियाने उत्पादन सुरक्षित असून सर्व नियामक नियमांचे पालन करत असल्याचा दावा केला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 03, 2026 | 09:31 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील ललित हॉटेल मधून घेतला नमुना
  • उत्पादनाची विक्री तातडीने थांबवण्याचे आदेश
  • नेस्ले इंडियाने आरोप फेटाळले
Food Scam : सध्या भारतात खासकरून महाराष्ट्रात खाद्य पदार्थांची भेसळ यावर तुकाराम मुंडे यांची आणि त्यांच्या डिपार्टमेंटची जोरदार कामगिरी सुरु आहे . या कारवाईची धास्ती एवढी वाढली आहे कि आता चक्क चायनीजच्या लॉलिपॉपचा सुद्धा लाल आर्टिफिशियल कलर गायब झाला असून लॉलीपॉप आता सफेद पांढऱ्या रंगाचे म्हणजे कलर विरहित झाले आहेत .

आणि तसेही भारतात मिळणाऱ्या जागतिक कंपन्यांच्या वस्तूंची क्वालिटी ही इतर जगात भेटणाऱ्या सेम वस्तूंच्या तुलनेत निकृष्ट आहे . असे सांगितले जाते . म्हणजे भारत हा जगासाठी डम्पिंग ग्राउंड बनत चालल्याचे सुद्धा काही जाणकार सांगत असतात . अशातच आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे . नेस्ले इंडियाच्या लो फॅट डेअरी व्हाईटनर या उत्पादनाच्या दिल्लीतील एका हॉटेलमधून घेतलेला नमुना अन्न सुरक्षा तपासणीत असुरक्षित आणि निकृष्ट आढल्याची माहिती भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) ने दिली आहे .

हा नमुना नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील द ललित हॉटेलमधून घेण्यात आला होता . प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधित उत्पादनाची विक्री तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत . या कारवाईमुळे नेस्ले इंडियाच्या खाद्य उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत .

दिल्लीतील ललित हॉटेल मधून घेतला नमुना

FSSAI च्या माहितीनुसार भारत हॉटेल्स लिमिटेडच्या द ललित हॉटेलमधून नेस्लेच्या लो फॅट डेअरी व्हाईटनरचा नमुना घेण्यात आला होता . तपासणीत हा नमुना संबंधित अन्न सुरक्षा नियमांशी सुसंगत नसल्याचे आढळले . त्यानंतर अन्न विश्लेषकांच्या अहवालात उत्पादनाला Unsafe आणि Substanderd अशी नोंद करण्यात आली आहे . संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रत देण्यात आली असून पुढील आवश्यक करण्यास सांगण्यात आले आहे .

National News : कॅप्टन स्मित मच्छार यांना मॅनकाइंड फार्माकडून १ कोटींचे बक्षीस; धैर्य आणि संयमाचा सन्मान

उत्पादनाची विक्री तातडीने थांबवण्याचे आदेश

प्रयोगशाळेच्या निष्कर्षानंतर FSSAI ने संबंधित उत्पादनाची विक्री तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत . भारत हॉटेल्स लिमिटेडला यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली आहे . मात्र संबंधित व्यवसायाला अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रयोगशाळेच्या अहवालाविरोधात निर्धारित कालावधीत अपील करण्याची संधी देण्यात आली आहे .

त्यामुळे सध्या ही कारवाई तपासणीतील विशिष्ठ नमुन्यावर केंद्रित आहे . FSSAI ने सार्वजनिक केलेल्या माहितीत उत्पादनातील नेमका कोणता घटक किंवा कोणत्या निकषांमुळे नमुना असुरक्षित ठरला , याचा सविस्तर तपशील अद्याप जाहीर केलेला नाही .

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

नेस्ले इंडियाने आरोप फेटाळले

या कारवाई नंतर नेस्ले इंडियाने आपले उत्पादन सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे . कंपनीच्या म्हणण्यानुसार लो फॅट डेअरी व्हाईट्नर लागू असलेल्या सर्व नियामक नियमांचे पालन करते . उत्पादनातील फॉस्फरस हा दुधात नैसर्गिकरित्या आढळणारा पोषक घटक असल्याचे कंपनीने म्हंटले आहे .

प्रयोगशाळेच्या अहवालात दुधातील नैसर्गिक फ़ॉस्फरसचा विचार न करता एकूण फ़ॉस्फरसची तुलना अतिरिक्त फॉस्फरससाठी असलेल्या मर्यादेशी करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे . नेस्लेने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असून आवश्यक माहितीही सादर केल्याचे म्हंटले आहे . त्यामुळे नियमकाचा निष्कर्ष आणि कंपनीची भूमिका यामध्ये सध्या मतभेद दिसून येत आहेत .

Web Title: Food scam sample of nestls low fat dairy whitener found unsafe in india information from the regulatorcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • FSSAI
  • Marathi News
  • Milk Production
  • Nestle
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा
1

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा

National News : कॅप्टन स्मित मच्छार यांना मॅनकाइंड फार्माकडून १ कोटींचे बक्षीस; धैर्य आणि संयमाचा सन्मान
2

National News : कॅप्टन स्मित मच्छार यांना मॅनकाइंड फार्माकडून १ कोटींचे बक्षीस; धैर्य आणि संयमाचा सन्मान

Gondhal Movie on Oscar: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी रंगणार! ९ ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ ६ शहरांत खास शो
3

Gondhal Movie on Oscar: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी रंगणार! ९ ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ ६ शहरांत खास शो

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले
4

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.