Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SCO Summit: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सुनावले खडे बोल, म्हणाले…

SCO बैठकीच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान संबंधांबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच यावेळी भारत पाकिस्तान आणि इतर शेजारी देशांशी आर्थिक, सुरक्षात्मक आणि व्यापारविषयक सहकार्याचे मुद्द्यांवर देखील चर्चा करणार आहे. या बैठकीत दहशतवाद, सीमावाद, आणि व्यापारातील वाढ यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. इस्लामाबादमध्ये या शिखर परिषदेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाकिस्तानने ठेवली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 16, 2024 | 03:49 PM
SCO Summit: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सुनावले खडे बोल, म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ही सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. २३ वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदत यावेळी पाकिस्तानमध्ये पार पडणार आहे. यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. या दौऱ्याचे महत्त्व विशेष आहे, कारण ९  वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचा असा उच्चस्तरीय दौरा पाकिस्तानामध्ये झाला आहे. याआधी २०१५ मध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती.  दरम्यान आपल्या भाषणार एस. जयशंकर यांनी पाकला खडे बोल सुनावले आहेत.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे आपल्या भाषणात म्हणाले, ” एकमेकांमधील विश्वास कमी झाला असे, सहकार्य मिळत नसेल, चांगले शेजारी असल्याची कमतरता जाणवत असेल तर त्यामागे असणारी कारणे शोधली पाहिजेत. यासाठी प्रामाणिकपणे चर्चा होणे आवश्यक आहे. एससीओ देशांमध्ये एकतर्फी अजेंडा नाही तर वास्तविक भागीदारी असली पाहिजे. तसे होणार नसल्यास विकास देखील होणार नाही.”

पुढे बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, “एससीओच्या आर्टिकल १ मध्ये आमचे उद्दिष्ट आणि कर्तव्ये स्पष्टपणे सांगितलेली आहेत. एकमेकांमध्ये मैत्री, विश्वास, शेजारील देशांशी चांगले संबंध असणे आणि क्षेत्रीय सहकार्य वाढवणे असे त्यात सांगण्यात आले आहे. या चार्टरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद, कट्टरतावाद यांचा उल्लेख असून, त्याविरोधात एकजुटीने लढले पाहिजे. सद्य स्थितीत याचा सामना करणे जास्त गरजेच बनले आहे. ”

Delivered 🇮🇳’s national statement at the SCO Council of Heads of Government meeting today morning in Islamabad. SCO needs to be able and adept at responding to challenges facing us in a turbulent world. In this context, highlighted that: ➡️ SCO’s primary goal of combatting… pic.twitter.com/oC2wHsWWHD — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 16, 2024

कडक सुरक्षा तैनात

SCO बैठकीच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान संबंधांबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच यावेळी भारत पाकिस्तान आणि इतर शेजारी देशांशी आर्थिक, सुरक्षात्मक आणि व्यापारविषयक सहकार्याचे मुद्द्यांवर देखील चर्चा करणार आहे. या बैठकीत दहशतवाद, सीमावाद, आणि व्यापारातील वाढ यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. इस्लामाबादमध्ये या शिखर परिषदेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाकिस्तानने ठेवली आहे. हॉटेल्स आणि परदेशी शिष्टमंडळांच्या मुक्कामासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

एस. जयशंकर यांचा हा दौरा भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये मोठे बदल घडवणार नाही. मात्र या परिषदेच्या माध्यमातून बहुपक्षीय सहकार्य आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित करत आहे. भारतासाठी हा दौरा SCO मधील आंतरराष्ट्रीय सहभागाचे महत्त्व आणि पाकिस्तानशी कायम ठेवायच्या संवादाची गरज यावर आधारित आहे.

 

Web Title: Foreign minister s jaishankar reply to pakistan at sco summit international marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • india
  • pakistan
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

PM मोदींनी नेपाळच्या पूर दुर्घटनेवर केले दु:ख व्यक्त ; काठमांडूला भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
1

PM मोदींनी नेपाळच्या पूर दुर्घटनेवर केले दु:ख व्यक्त ; काठमांडूला भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार ; अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती, ४७ जणांचा मृत्यू 
2

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार ; अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती, ४७ जणांचा मृत्यू 

मोठी दुर्घटना टळली! बर्मिंगहॅममध्ये एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लॅंडिग; थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव
3

मोठी दुर्घटना टळली! बर्मिंगहॅममध्ये एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लॅंडिग; थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?
4

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.