Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा तडाखा बसला असून पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. 160 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. हजारो नागरिक बेपत्ता असल्याने बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 11, 2026 | 07:09 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • भूकंपाने माजवली मोठी हाहाकार
  • ढिगाऱ्याखाली जीवनाचा शोध
  • सरकारकडून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
Colombia Earthquake : कोलंबियाला सोमवारी, 10 ऑगस्ट रोजी 7.4 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा मोठा धक्का बसला. पश्चिम कोलंबियातील चोको भागाला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्या आहेत. ताज्या माहितीनुसार मृतांचा आकडा 164 वर पोहोचला असून 570 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. हजारो नागरिक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भूकंपाने माजवली मोठी हाहाकार

भूकंपाचा केंद्रबिंदू चोको विभागातील सॅन होसे डेल पालमार परिसरात असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे जोरदार धक्के काली, क्विब्दो, पेरेरा आणि आसपासच्या अनेक शहरांमध्ये जाणवले. राजधानी बोगोटामध्येही नागरिकांना भूकंपाचे हादरे जाणवले आणि अनेकांनी सुरक्षिततेसाठी इमारतीबाहेर धाव घेतली.

भूकंपामुळे सुमारे 1,600 इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक इमारती पूर्णपणे कोसळल्याने नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांनाही मोठा फटका बसला आहे.

Iran Cyber Attack: मिसाइल नाही, आता ‘सायबर हल्ले’! अमेरिकेतील ७ राज्यांच्या वॉटर सिस्टिमवर हॅकर्सचा निशाणा; इराणचे नाव चर्चेत

ढिगाऱ्याखाली जीवनाचा शोध

भूकंपानंतर कोलंबियात मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सैनिक, अग्निशमन दलाचे जवान, आपत्कालीन पथके आणि स्थानिक नागरिक ढिगाऱ्यांमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. काही ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने बचाव पथकांना हातानेच ढिगारा हटवावा लागत आहे.

हजारो नागरिक बेपत्ता असल्याच्या नोंदी समोर आल्याने बचावकार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले असण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने संवेदनशील भागांमध्ये शोधमोहीम तीव्र केली आहे.

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

सरकारकडून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर कोलंबिया सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. प्रशासनाने बचाव आणि मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत असून प्रभावित भागांमध्ये मदत सामग्री पोहोचवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, भूकंपानंतर काही भागांमध्ये वीज आणि दळणवळणाच्या सेवांवरही परिणाम झाला आहे. अनेक कुटुंबे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत. आफ्टरशॉकची शक्यता असल्याने नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोलंबियाने पाहिलेल्या सर्वात भीषण भूकंपांपैकी हा एक भूकंप ठरला असून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच या आपत्तीतील नुकसानीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Colombia earthquake colombia hit by a 74 magnitude earthquake over 160 dead thousands missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Earthquake
  • Emergency Alert
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.