झारखंड: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. पण त्यांनी अखेर आपले राजकीय भवितव्य ठरवले आहे. चंपाई सोरेन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मा चंपाई सोरेन गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी चंपाई सोरेनसोबत एकत्र आल्याने भाजपला मोठा फायदा होऊ शकतो.
चंपाई सोरेन यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा हेदेखील उपस्थित होते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या देशातील प्रख्यात आदिवासी नेते चंपाई सोरेन यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती सीएम हेमंता बिस्व सरमा यांनी दिली आहे. रांचीमध्ये 30 ऑगस्ट रोजी चंपाई अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
हेदेखील वाचा: महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
चंपाई सोरेन यांनी अलीकडेच राजकारणातून संन्यास घेणार नसल्याचे सांगितले होते. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आपण राजकारणात राहणे आवश्यक आहे. आपल्या राजकीय भवितव्याबाबत आठवडाभरात निर्णय घेणार असल्याचे चंपाई सोरेन यांनी सांगितले होते. चंपाई सोरेन यांनी दोन पर्याय निवडले होते. यातील पहिला म्हणजे, स्वतंत्र संघटना स्थापन करणे आणि दुसरा आम्हाला जोडीदार मिळाला तर आम्ही त्याच्यासोबत प्रवास सुरू करू असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. हेमंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांना झारखंडचे नवे मुख्यमंत्री करण्यात आले. झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची पुन्हा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर चंपाई सोरेन यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही दिवसांनी चंपाई सोरेन यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.
हेदेखील वाचा: व्यायाम तर केला पण शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी खाऊ काय? ‘हे’ पदार्थ बनवतील तुमचे स्नायू दणकट