
272 people write an open letter to Rahul Gandhi
काँग्रेसने निवडणूक आयोगावर भाजपशी संगनमत असल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना गटाने पत्रात राहुल गांधींवर टिका केली आहे. “समाजातील ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्हाला चिंता वाटते की भारताची लोकशाही संस्थांविरुद्धच्या विषारी भाषणामुळे घेरावात सापडली आहे. काही राजकारणी कोणताही ठोस पर्याय न देता नाट्यमय रणनीतींचा भाग म्हणून निराधार आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहेत.” असा आरोपही केला आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय संस्थांवर केलेल्या कथित आरोपांवर २७२ माजी अधिकारी आणि मान्यवरांनी स्वाक्षरी केलेले पत्र जारी केले आहे. या पत्रावर १६ निवृत्त न्यायाधीश, १२३ माजी नोकरशह, १३३ निवृत्त लष्करी अधिकारी आणि १४ माजी राजदूत अशा एकूण २७२ व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्राला अद्याप राहुल गांधी किंवा कोणत्याही राहुल गांधी किंवा काँग्रेसकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
भारतीय सशस्त्र दलांच्या धाडस व कामगिरीवर, न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर, तसेच संसदेवरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्या संस्थांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. आता या कृतींचा विस्तार होत भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठा आणि सचोटीवरही ‘कट रचून हल्ले’ केले जात असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात निवडणूक आयोगावर केलेल्या त्यांच्या आरोपांवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी वारंवार निवडणूक आयोगावर हल्ले चढवले असून मतदान प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे दावे केले आहेत “अशा गंभीर आरोपांनंतरही त्यांनी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही,” असा उल्लेख गटाने केला आहे.
पत्रानुसार, काँग्रेससह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, काही डाव्या विचारसरणीच्या स्वयंसेवी संस्था आणि लक्षवेधी व्यक्ती या कथित “एसआयआरविरोधी” वक्तव्यांमध्ये सामील झाले असल्याचे नमूद केले आहे.
“निवडणूक आयोग निर्लज्जपणे भाजपच्या बी-टीमसारखे वागत आहे,” अशी वक्तव्ये करण्यात आली असली तरी ही आरोपात्मक भाषा भावनिक असू शकते, परंतु ती कोणत्याही तपासात टिकत नाही. आयोगाने एसआयआरची माहिती सार्वजनिक केली आहे, न्यायालयाने निर्देशित केलेल्या प्रक्रियांचे पालन केले आहे, अपात्र मतदारांची नावे वगळली आहेत आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी केली आहे, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, निवडणूक आयोगावर होत असलेली टीका ही केवळ संस्थात्मक संकटाचे आभास निर्माण करून राजकीय निराशा लपवण्याचा प्रयत्न आहे.
पंतप्रधानांकडे तक्रार केली तरी विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडताना शांत बसू शकत नाही : फडणवीस
पत्रात काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वारंवार निवडणुकीतील पराभव आणि त्यातून निर्माण झालेल्या रागामुळे अशी वक्तव्ये होत असल्याची टीकाही या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. “जेव्हा राजकारणी नागरिकांच्या आकांक्षांकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा ते स्वतःची विश्वासार्हता पुनर्संचयित करण्याऐवजी संस्थांवर राग काढत आहेत,” असे त्यात नमूद केले आहे.
विश्लेषणाऐवजी नाट्यमय टीका केली गेली तर सार्वजनिक सेवा “तमाशा बनते.” विरोधी पक्षांच्या सरकारे असलेल्या काही राज्यांत निकाल अनुकूल असल्यास निवडणूक आयोगावरची टीका अचानक थांबते, मात्र काही राज्यांत निकाल प्रतिकूल आल्यास आयोगालाच दोष दिला जातो, अशीही खंत व्यक्त करण्यात आली आहे.