Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बिघडणार

नगरपंचायतमध्ये भाजपला सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी नगरसेविका कल्पना मारोटकर यांनाही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपाला रामराम ठोकला. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 19, 2025 | 03:22 PM
बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस 'अॅक्शन मोड'वर; 'या' बड्या नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस 'अॅक्शन मोड'वर; 'या' बड्या नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरात राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (दि.१७) काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत पारस्कर यांनी कमळाची निशाणी हाती घेतली आणि त्यामुळे नांदगावमधील काँग्रेसमध्ये मोठे खळबळजनक ‘खिडार’ पडले.

पारस्कर कुटुंबाची तीन पिढ्यांची काँग्रेसशी असलेली निष्ठा संपुष्टात आली आहे. अक्षय पारस्कर यांच्या मातोश्रींना काँग्रेसने नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारल्याने नाराजी पेटली. या नाराजीचा फायदा घेत भाजपाने योग्य राजकीय खेळी करत पारस्करांना वळविले, असा राजकीय सूत्रांचा दावा आहे. या घडामोडीनंतर शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्या सुरेखा शिंदे यांनी अखेर अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केली आहे.

याशिवाय, नगरपंचायतमध्ये भाजपला सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी नगरसेविका कल्पना मारोटकर यांनाही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली.

काँग्रेसमध्येही नाराजीचे वादळ

काँग्रेसच्या निष्ठावंत नगरसेविका सीमा जाधव यांना नगराध्यक्ष तसेच नगरसेवकपदाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अक्षय पारस्कर यांच्या पक्षांतरामुळे शिवाय भाजप-काँग्रेसमधील असंतोष आणि राष्ट्रवादीच्या एंट्रीनंतर नांदगावची नगरपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या राजकीय घडामोडींचा मतदारांवर नेमका काय प्रभाव होतो हे प्रत्यक्ष मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतरच खरे राजकीय चित्र समोर येणार असून, नांदगावच्या राजकारणातील रंगत अजून वाढण्याची पूर्ण शक्यता आहे.

शिवसेनेच्या एका निर्णयामुळे राजकारणात खळबळ

दुसरीकडे, रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार तथा नगराध्यक्ष राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे राजन साळवी यांना रत्नागिरी मोठा झटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

हेदेखील वाचा : Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान

Web Title: The political equation will deteriorate on the eve of the elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Congress Politics
  • Maharashtra Politics
  • Nashik News
  • political news

संबंधित बातम्या

Nashik News : फोर्टिफाईड राईसबाबत गैरसमज दूर करा; प्लास्टिक तांदूळ नसून पोषक धान्य, सिन्नर तहसीलदारांचे आवाहन
1

Nashik News : फोर्टिफाईड राईसबाबत गैरसमज दूर करा; प्लास्टिक तांदूळ नसून पोषक धान्य, सिन्नर तहसीलदारांचे आवाहन

Kharge Apologizes to Gujarati : आधी गुजरात्यांना म्हटले ‘बेवकुफ’ अन् नंतर मागितली माफी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चर्चेत
2

Kharge Apologizes to Gujarati : आधी गुजरात्यांना म्हटले ‘बेवकुफ’ अन् नंतर मागितली माफी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चर्चेत

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का
3

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.