Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi : UNSC आणि WTO मध्ये मोठ्या सुधारणा गरजेच्या; BRICS शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचं स्पष्ट मत

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC), जागतिक व्यापार संघटना (WTO) आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था आता कालबाह्य झाल्या आहेत आणि त्यात मूलभूत सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 07, 2025 | 02:06 AM
UNSC आणि WTO मध्ये मोठ्या सुधारणा गरजेच्या; BRICS शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचं स्पष्ट मत

UNSC आणि WTO मध्ये मोठ्या सुधारणा गरजेच्या; BRICS शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचं स्पष्ट मत

Follow Us
Close
Follow Us:

ब्राझीलमध्ये झालेल्या १७व्या BRICS शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संस्थांच्या कार्यपद्धतीवर ठाम भूमिका घेतली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC), जागतिक व्यापार संघटना (WTO) आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था आता कालबाह्य झाल्या आहेत. त्यात मूलभूत सुधारणा होणं अत्यंत आवश्यक आहे. विकसनशील देशांचा आवाज या संस्थांमध्ये योग्यप्रकारे पोहोचत नसल्याची खंत मोदींनी व्यक्त केली आहे.

Bihar Elections : खरगेंचे आरोप भ्रामक, निवडणूक आयोगाने सोडलं मौन; बिहारातील SIR प्रक्रियेबाबत दिलं स्पष्टीकरण

पंतप्रधान मोदींनी BRICS देशांच्या विस्तारीकरणाचे स्वागत करत म्हणाले की, इंडोनेशियासारखा देश जेव्हा या संघटनेत सामील होतो, तेव्हा हे सिद्ध होते की BRICS ही केवळ चर्चा करणारी संस्था नाही, तर काळाच्या गरजेनुसार स्वतःमध्ये बदल घडवणारी आणि नव्या मित्रांचा स्वीकार करणारी संघटना आहे. त्यांनी उपस्थित राष्ट्रप्रमुखांचे आभार मानले आणि BRICSच्या यशस्वी आयोजनाबद्दल ब्राझीलचे अध्यक्ष लूला यांचं विशेष कौतुकही केलं.

“ग्लोबल साऊथला निर्णय प्रक्रियेत स्थान नसेल, तर जागतिक संस्था म्हणजे सिम असलेला फोन, पण त्याला नेटवर्कच नसल्याचं त्यांनी म्हटलं.  २०व्या शतकात स्थापन झालेल्या संस्था २१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञान, आव्हाने आणि गरजांना प्रतिसाद देण्यास असमर्थ ठरत असल्याचंही ते म्हणाले.

AI आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगातही काही जागतिक संस्थांमध्ये गेल्या ८० वर्षांत एकदाही सुधारणा झालेली नाही.  २०व्या शतकातील टायपरायटरने २१व्या शतकातील सॉफ्टवेअर चालवण्याचा प्रयत्न करता येत नाही,. ग्लोबल साऊथमधील देशांना केवळ भाषणांमध्ये नव्हे, तर निर्णय प्रक्रियेत प्रभावी सहभाग मिळाला पाहिजे, असा आग्रह मोदींनी धरला. त्यांनी असेही नमूद केले की, आजच्या जागतिक संस्था ना संघर्ष थांबवू शकतात, ना महामारी रोखू शकतात, ना सायबर आणि अवकाशातील धोके हाताळू शकतात. त्यामुळे, केवळ चर्चा न करता निर्णय प्रक्रियेत आमूलाग्र बदल गरजेचं आहे. भारत नेहमीच स्वार्थापेक्षा मानवतेच्या भल्यासाठी काम करत आला आहे. “आम्ही सर्व भागीदारांसोबत कार्य करण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Chirag Paswan : बिहारच्या राजकारणात अखेर चिराग पासवान यांची अधिकृत एन्ट्री; सर्व २४३ जागा लढण्याची केली घोषणा

या परिषदेतून पंतप्रधान मोदींनी जागतिक व्यासपीठावर केवळ भारताचेच नव्हे, तर सर्व विकासशील देशांचे प्रतिनिधित्व केलं. BRICS चा विस्तार, नव्या देशांचा समावेश यामुळे या ब्रिक्सचं महत्त्व जागतिक पातळीवर आणखी वाढत आहे.

Web Title: Global south victim of double standards un wto reforms at brics summit indian pm narendra modi says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 11:29 PM

Topics:  

  • Brics Council
  • PM Modi Speech
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
2

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
3

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
4

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.