Gujrat riots 2002: गुजरात राज्यात २००२ साली साबरमती एक्सप्रेसला लागलेली आग आणि त्यानंतर झालेल्या दंगलीचे पडसाद केवळ गुजरातच नव्हे तर देशातही उमटले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. २००२ साली झालेल्या गुजरात दंगलींवर माजी राज्यसभा खासदार तरलोचन सिंह यांनी त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केलं आहे.
ANI या वृ्त्तसंस्थेशी बोलताना तरलोचन सिंह म्हणाले की, गुजरातमध्ये २००२ साली झालेली दंगल साबरमती एक्सप्रेस आगीच्या घटनेच्या रागाचा परिणाम होती. त्यावेळी नरेंद्र मोदींनी ती चांगल्या प्रकारे हाताळली नाहीतर संपूर्ण गुजरात जळून खाक झाले असते. ट्रेनमध्ये जिवंत जाळलेल्या लोकांचे नातेवाईक त्यांचे मृतदेह त्यांच्या गावी घेऊन जाऊ इच्छित होते, परंतु नरेंद्र मोदींनी त्यांचे अंत्यसंस्कार तिथेच केले. जर हे मृतदेह त्यांच्या गावी पोहोचले असते तर लोक किती संतप्त झाले असते. असे झाले असते तर संपूर्ण गुजरात जळून खाक झाले असते, याची कल्पना करा, परंतु नरेंद्र मोदींनी धाडस दाखवले आणि हे होऊ दिले नाही, असा खळबळजनक दावा तरलोच सिंह यांनी केला.
भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून
मी २००२ मध्ये अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष होतो. गुजरात दंगली १९८४ च्या दिल्लीतील दंगलींप्रमाणे सरकार पुरस्कृत नव्हत्या. जनतेच्या संतापामुळे २००२ च्या दंगली घडल्या. त्यात सरकारची कोणतीही भूमिका नव्हती, असंही सिंह यांनी नमुद केलं. २००२ च्या गुजरात दंगलींमध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या दंगलींवरून काँग्रेसने अनेकदा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोपही केले आहेत.
तरलोचन सिंह म्हणाले की, ही घटना घडल्यानतंर पोहोचणाऱ्या पहिल्या लोकांमध्ये मी होतो. मी या घटनेची चौकशी केली. कोणालाही त्याबद्दल माहिती नव्हती. मी २००० मध्ये अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष झालो आणि २००२ मध्ये गुजरात दंगली झाल्या. मी गुजरात दंगलींवर एक पुस्तिका देखील लिहिली आहे. ही पुस्तिका देखील छापण्यात आली होती आणि नरेंद्र मोदींनी त्याच्या ५०० प्रती वाटल्या. मी दिल्लीतील शीख दंगलींची तुलना गुजरात दंगलींशी केली होती. दिल्ली दंगली सरकार पुरस्कृत होत्या, परंतु गुजरात दंगली ही जनतेच्या संतापाची अभिव्यक्ती होती. त्या दंगलीमध्ये सरकार किंवा त्यांच्या कोणत्याही माणसाची भूमिका नव्हती. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
Mumbai Crime: संतापजनक! तीन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य, आरोपी अटकेत; मुंबईतील घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना तरलोचन सिंह म्हणाले की, “गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका त्यावेळी कौतुकास्पद होती. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी सर्व मारल्या गेलेल्या कारसेवकांचे अंत्यसंस्कार तिथेच करावेत असा निर्णय घेतला. जर ते मृतदेह गावांमध्ये पोहोचले असते तर किती संताप निर्माण झाला असता याची आपण कल्पनाच करू शकतो. संपूर्ण गुजरात पेटला असता, पण नरेंद्र मोदींनी धाडस दाखवून परिस्थिती हाताळली. परिणामी ही दंगल फक्त अहमदाबाद आणि त्याच्या आसपासच्या भागातच झाल्या. संपूर्ण गुजरातमध्ये परिस्थिती बिघडली नाही.