प्रभाग क्रमांक १८ मधील रस्त्यांची दुरवस्था गणेशोत्सव मंडळांसाठी डोकेदुखी ठरत होती. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने गणेशमूर्ती मंडळांपर्यंत आणताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक अभिजीत भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांचे पॅचवर्क करण्याची मागणी केली. गणेशोत्सवाच्या आधी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला होता.