रवीचंद्रन आश्विन(फोटो-सोशल मीडिया)
Ravichandran Ashwin IPL Retirement : भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज आर आश्विनने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या आर आश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्ती जाहीर करताना त्याने म्हटले आहे की, तो आता आयपीएल खेळणार नसून जगभरातील टी-२० लीगमध्ये सहभागी होणार आहे.
एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की, गेल्या वर्षी २०२४ मध्ये भारताचा अनुभवी गोलंदाज आर. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाब्बा कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्या काळात त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत राहणार असल्याचे सांगितले होते. तो आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक महत्वाचा खेळाडू होता. परंतु या काळात त्याला अनेक खेळायला मिळाले नाहीत.
आर. अश्विनने अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अनेक वेळा वादग्रस्त विधाने करून वादात सापडला होता. त्यानंतर बोलेल जाऊ लागले की, त्याची आयपीएल कारकीर्द जास्त काळ असणार नाही. आता हा अंदाज खरा ठरला आहे. आश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्याने लिहिले की, “आज माझ्यासाठी एक खास दिवस असून एक खास सुरुवात देखील आहे. असे म्हटले जाते की प्रत्येक सामन्याची एक नवीन सुरुवात असते, आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा कार्यकाळ आज संपत आहे, परंतु विविध लीगमध्ये खेळाचा शोध म्हणून माझा वेळ आजपासून सुरू होत आहे.”
Special day and hence a special beginning.
They say every ending will have a new start, my time as an IPL cricketer comes to a close today, but my time as an explorer of the game around various leagues begins today🤓.
Would like to thank all the franchisees for all the…
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) August 27, 2025
आर. अश्विनने पुढे लिहिले की, “मी त्या सर्व फ्रँचायझींना इतक्या अद्भुत आठवणी आणि नातेसंबंधांबाबत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयपीएल आणि बीसीसीआयचे आभार मानू इच्छित आहे, ज्यांनी मला आतापर्यंत जे काही दिले आहे. मी पुढे जे काही आहे त्याचा आनंद घेण्यास आणि त्याचा पूर्ण फायदा घेण्यास खूप उत्सुक आहे.”
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘आता मी ठीक,आशिया कपसाठी सज्ज..’, कर्णधार सूर्यकुमार यादवने फोडली डरकाळी
आर. अश्विनची आयपीएल कारकीर्द
आर. अश्विन ३८ वर्षांचा आहे. आर. अश्विन आतापर्यंत एकूण २२० आयपीएल सामन्यात खेळला आहे. या दरम्यान अश्विनने १८७ बळी घेतले आहेत. त्याच वेळी, या लीगमध्ये त्याची सरासरी ३०.२२ आहे तर इकॉनॉमी ७.२ इतकी राहिली आहे. याशिवाय, अश्विनने आयपीएलच्या एकूण २१७ डावांमध्ये ८३३ धावा देखील केल्या आहेत. आर. अश्विन आयपीएलमध्ये एकूण पाच संघांकडून खेळला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांचा समावेश आहे. त्याच वेळी, तो पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणूनही खेळला आहे