मुंबई: मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. अश्लील कृत्य करणाऱ्या ५८ वर्षीय आरोपीला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. आरोपी दारूखाना परिसरातील रहिवासी असून त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार मुलगी 12 वर्षांची आहे. ती तिच्या दोन मैत्रिणींसह रविवारी रात्री जात होती. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीने खुणावले.परिचित व्यक्ती वाटल्यामुळे त्या थांबल्या. त्यांनी पीडित मुलींकडे पाहून अश्लील कृत्य केले. त्यानंतर त्यांच्याकडे पाहून शिवीगाळ केली. या प्रकारामुळे तिन्ही मुली घाबरल्या आणि त्यांनी याबातची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. त्यांनी सोमवारी या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ भारतीय न्यायसंहिता कलम ७९ व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीला राहत्या परिसरातून अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी गटार साफ करण्याचे काम करतो.
इंस्टाग्रामवर मित्राच्या प्रेयसीला पाठवले अश्लील मॅसेज, मित्राची मॉब लिंचिंग करत हत्या
मुंबईच्या नालासोपाऱ्याच्या पूर्व मोरेगाव येथे इंस्टाग्रामवर मित्राच्या प्रेयसीला अश्लील मॅसेज पाठवल्याच्या रागातून मित्रांनीच मॉब लिंचिंग करत एक तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृतकाचे नाव प्रतीक वाघे (वय 24) असे आहे तर भूषण पाटील हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आरोपी हा व्यायाम पट्टू आहे.
नेमकं काय घडलं?
मृतक प्रतीक आणि आरोपी भूषण हे दोघेही तीन वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. दोघेही पूर्वी मीरारोडच्या भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होते. प्रतीक सध्या तेथेच कार्यरत होता. भूषण याने दोन वर्षांपूर्वी नौकरी सोडली होती. प्रतिकने भूषणच्या प्रेयसीला इंस्टाग्रामवर अश्लील मॅसेज पाठवल्यानंतर, भूषणने हा राग मनात धरला. 24 ऑगस्टच्या रात्री त्याने प्रतीकला मोरेगाव येथे बोलावून घेतले व ग्रुपसह बेदम मारहाण केली.
मारहाणीचा व्हिडीओ आरोपीनीच काढला व सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीत प्रतीक गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत प्रतीकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला इतकं मारलं होत की, तो अर्धमेला झाला होता. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरु केले. पण उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला. या घटनेननंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीचा प्रियकर भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह 7 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.