Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तरेत उष्णतेची लाट कायम; श्रीगंगानगर ठरले सर्वात ‘हॉट’, तापमानाचा पारा ४८.२ अंशांवर…

श्रीगंगानगरचे तापमान सामान्यापेक्षा ५.५ अंशांनी अधिक होते, तर राजस्थानच्या इतर भागांत ४६ ते ४७ अंश तापमान राहिले. पिलानी ४७ अंशांसह दुसरे सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2026 | 08:22 AM
उत्तरेत उष्णतेची लाट श्रीगंगानगर @ ४८.२

उत्तरेत उष्णतेची लाट श्रीगंगानगर @ ४८.२

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : उष्णतेच्या लाटेने उत्तर भारत अक्षरशः होरपळून निघत आहे. हवामान विभागानुसार, राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे देशात सर्वाधिक ४८.२ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले. मैदानी प्रदेशात कमाल तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त होते, तेव्हा उष्णतेची लाट जाहीर केली जाते; तर ४७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाला तीव्र उष्णतेची लाट म्हटले जाते.

श्रीगंगानगरचे तापमान सामान्यापेक्षा ५.५ अंशांनी अधिक होते, तर राजस्थानच्या इतर भागांत ४६ ते ४७ अंश तापमान राहिले. पिलानी ४७ अंशांसह दुसरे सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरले. पाठोपाठ बिकानेर (४६.६), चुरू आणि जैसलमेर (४६.४), फलोदी (४६.२) आणि कोटा (४५.४) यांचा क्रमांक लागला. उत्तर प्रदेशचा बांदा जिल्हा ४७.८ अंशांसह राज्यात सर्वाधिक उष्ण ठरला आहे. प्रयागराज (४६.४), झाशी (४६ , ओराई (४५.६) आणि देवमाली (४५.१ अंश) येथेही उच्च तापमान राहिले. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडचे तापमान ४५ ते ४६ अंशांदरम्यान राहिले.

दरम्यान, डेहराडून हवामान केंद्राने उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही दिवसांत पाऊस, गारपीट आणि वारा वाहण्याची शक्यता आहे.

नागपुरात दहा जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच उष्णतेने जनजीवन विस्कळीत होत आहे. बुधवारी शहरासह नागपूर रेल्वे स्थानक आणि विविध गाड्यांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये शहर हद्दीत ५, स्थानकावर २ तर ३ प्रवाशांचा मृत्यू गाड्यांच्या आत झाला.

भीषण उष्णता आणि गर्दी ठरली जीवघेणी

रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, गाड्यांमधील प्रचंड उष्णता आणि सामान्य डब्यांतील अतिगदर्दीमुळे प्रवाशांची प्रकृती सतत बिघडत आहे. अनेक कोचमध्ये पुरेशा वायुवीजनाची व्यवस्था नसल्याने आतील तापमान अधिक जाणवत आहे. रेल्वेकडून या मृत्यूंचे कारण आजारपण सांगितले जात असले, तरी प्रथमदर्शनी उष्माघाताची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. जीआरपीने आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

पुण्याच्या तापमानात मोठी वाढ; तापमानाचा पारा 38 अंशांवर, ढगांची चाहूल तरीही उकडा कायम

Web Title: Heatwave persists in the north sri ganganagar emerges as the hottest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • heat wave
  • Increase in Temperature

संबंधित बातम्या

उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले
1

उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.