Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा:कार; 12 जणांचा मृत्यू, 24 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

राजधानी पाटणासह दक्षिण बिहार आणि उत्तर बिहारच्या पश्चिम भागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेल्या २४ जिल्ह्यांसाठी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2026 | 12:42 PM
बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा:कार; 12 जणांचा मृ्त्यू, 24 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा:कार; 12 जणांचा मृ्त्यू, 24 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

Follow Us
Follow Us:

पटणा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. असे असताना आता बिहारमधील हवामान बदलल्याचे पाहिला मिळाले. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले. विविध जिल्ह्यांमध्ये वीज पडून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यानुसार, 24 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बिहार राज्यातील जनता तीव्र तापमानामुळे चिंतेत होती. आता हे तापमान सुमारे 8 अंशांनी कमी झाल्याने तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राजधानी पाटणासह दक्षिण बिहार आणि उत्तर बिहारच्या पश्चिम भागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेल्या २४ जिल्ह्यांसाठी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भागलपूर आणि बांका जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे, तर राजधानी पाटणामध्ये पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची दाट शक्यता आहे. शनिवारी राज्याच्या तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नसल्याचे अंदाज आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात मोठी दुर्घटना; बांधकाम सुरु असलेला पूलच कोसळला, सहा जणांचा मृत्यू

दरम्यान, पाटणा हवामान केंद्राने शनिवारी नैऋत्य बिहारच्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे, जिथे सहसा उष्ण हवामान असते. रोहतास, भाबुआ, बक्सर, भोजपूर, अरवल आणि औरंगाबादमध्ये खराब हवामानाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता असून, विजांचा कडकडाटही होणार असल्याची माहिती आहे.

अनेक ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज

याव्यतिरिक्त, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सिवान, सारण, नालंदा, जहानाबाद, नवादा, गया, लखीसराय, शेखपुरा, जमुई, मुंगेर, बांका, खगडिया आणि भागलपूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाटाची शक्यता आहे. यामध्ये वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत असेल.

मधुबनी, शिवहर, सीतामढीला ऑरेंज अलर्ट

ईशान्य बिहारसह काही जिल्ह्यांमध्ये ३१ मे आणि १ जून रोजी हवामान बिघडण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर बिहारच्या पूर्व आणि मध्य भागांमध्ये, जिथे मुसळधार पाऊस पडत आहे, तिथे पावसाचा कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. मात्र, हवामान विभागाने आज पहाटे १ ते ५ च्या दरम्यान पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, दरभंगा, मधुबनी, शिवहर, सीतामढी आणि मुझफ्फरपूरमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला आहे.

Web Title: Heavy rains windstorm lash bihar 12 people die know actual weather

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Bihar News
  • Rain News
  • Weather forecast

संबंधित बातम्या

अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी
1

अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?
2

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?

वडज धरणातून 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू; मीना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
3

वडज धरणातून 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू; मीना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पावसाच्या सरींमध्ये रुजतंय हरित स्वप्न; ‘फॉरेस्ट’चा १० लाख सीडबॉल्सचा संकल्प
4

पावसाच्या सरींमध्ये रुजतंय हरित स्वप्न; ‘फॉरेस्ट’चा १० लाख सीडबॉल्सचा संकल्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.