Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यपालांच्या पत्रावर तारीख आधीची असताना पत्र आताच कसे बाहेर आले? खा. अमोल कोल्हेंचा सवाल

राज्यपालाचं पत्र नेमकं आजच का बाहेर आलं? त्यावरची तारीख खूप अगोदरची असताना आजच ते उघड कसं झालं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपस्थित केला आहे. पत्रावरील तारीख ६ डिसेंबरची आहे. आणि ते पत्र आज १२ डिसेंबर रोजी कसं बाहेर आलं? यामागे नेमकं काय राजकारण आहे? काय हेतू आहे?

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 12, 2022 | 02:31 PM
राज्यपालांच्या पत्रावर तारीख आधीची असताना पत्र आताच कसे बाहेर आले? खा. अमोल कोल्हेंचा सवाल
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड, प्रसाद लाड (Koshyari, Mangalprabhat Lodha and Sanjay Gaikwad, Prasad lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून, भाजपाच्या नेत्याविरोधात शिवप्रेमी तसेच विरोधक आंदोलन करत असून, यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राज्यातून हकालपट्टी व्हावी, या मागणीला जोर धरत आहे.

[read_also content=”ट्विटर आता 280 ऐवजी 420 शब्दमर्यादा वाढवणार, मस्क यांनी यूजर्सला दिले ‘हे’ उत्तर https://www.navarashtra.com/india/twitter-will-now-increase-the-word-limit-musk-replied-to-this-users-352935.html”]

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी व्हावी, या मागणीसाठी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी पीएमओ कार्यालयाला पत्र दिलं होतं. तसेच गृहमंत्री अमित शहांची भेट देखील घेतली होती. त्याआधी त्यांनी राज्यपाल हटावसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आत्मक्लेश केला. दरम्यान, राज्यपालांची हकालपट्टी व्हावी या मागणीला जोर धरत असताना आणि चारीबाजूनी कोंडी झाल्यानंतर स्वत: राज्यपालांनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून स्पष्टिकरण दिले आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपालाचं पत्र नेमकं आजच का बाहेर आलं? त्यावरची तारीख खूप अगोदरची असताना आजच ते उघड कसं झालं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपस्थित केला आहे. पत्रावरील तारीख ६ डिसेंबरची आहे. आणि ते पत्र आज १२ डिसेंबर रोजी कसं बाहेर आलं? यामागे नेमकं काय राजकारण आहे? काय हेतू आहे?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे.

भाजपा नेत्यांची काय आहेत वादग्रस्त वक्तव्यं?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे जुन्या काळातील आदर्श होते. आताच्या काळातील आदर्श नितीन गडकरी आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबची माफी मागितली होती, असं विधानं केलं. मंत्री मंगलप्रभात लोढा व संजय गायकवाड यांनी शिंदे गटाने केलेल्या बंडाची तुलना महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म शिवनेरीवर झाला नसून, कोकणात झाला आहे. आणि महाराजांचे बालपण रायगडावर गेले आहे असं म्हटलंय. यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळं  राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून भाजपाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.

 

Web Title: How come the letter came out now when the date on the governor letter was earlier amol kolhe question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2022 | 02:16 PM

Topics:  

  • amol kolhe
  • Bhagat Singh Koshyari
  • BJP
  • Raosaheb Danve

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.