Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

दिल्लीतील जंतरमंतरवरील CJP आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 20, 2026 | 09:46 PM
'दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले...' भाजप नेता पुन्हा बरळला,

'दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले...' भाजप नेता पुन्हा बरळला,

Follow Us
Follow Us:
  • जंतरमंतर आंदोलनावर अतुल भातखळकरांची पुन्हा टीका
  • संसद मोर्चा रोखताना पोलिसांकडून कारवाई
  • वक्तव्यावरून सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया
 

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांनी जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संसद परिसरातील सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. आरपीएफचे जवान आणि पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.यावरून आता देशभरातून मोठ्या प्रतिक्रिया येत असून अश्यातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा या आंदोलनावर टीका करत मुक्ताफळे उधळली आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर टीका करत “दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवलेले आहेत,” अश्या शब्दांत टीका केली आहे.

काय म्हणाले भातखळकर ?

अतुल भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवलेले आहेत. संसदेत शिरायचं असेल तर निवडणुका लढा आणि शिरा, इथे घुसखोरी केलीत तर पोलीस प्रसाद देणारच.”

लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवलेले आहेत. संसदेत शिरायचं असेल तर निवडणुका लढा आणि शिरा, इथे घुसखोरी केलीत तर पोलीस प्रसाद देणारच. — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 20, 2026

एकीकडे आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईबाबत देशभरात संतापाचे वातावरण असताना अतुल भातखळकरांच्या विधानाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. NEET पेपर फुटीनंतर 20 हुन अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान कारणीभूत असून त्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामाँ द्यावा यासाठी विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

अभिजित दिपकेवर सुद्धा केली होती टीका

याआधीही भातखळकरांनी CJP चे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांच्यावर टीका केली होती. त्यात ते म्हणाले, “अतुल भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत. बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेलं आहे.”

कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत.
बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 19, 2026


अतुल भातखळकरांच्या वक्तव्याला आता मोठा विरोध होत असून लोकशाही मार्गाने होत असलेल्या आंदोलनाला दडपण्याचे प्रयत्न होत असल्याचे तसेच लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा आणि राजीनाम्याची मागणी करण्याचाही अधिकार संविधानाने दिला असल्याचे मत लोक व्यक्त करत आहेत.

‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात

Web Title: Atul bhatkhalkar criticises cjp protest delhi lathicharge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • BJP
  • CJP
  • CJP Protest
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप
1

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.